-
आधार कार्डद्वारे लोकांना मोबाईल सिम कार्ड दिलं जाते. अनेक वेळा आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत, हे देखील आपल्याला माहिती नसते.
-
याबाबतमी माहिती आपल्याला मिळू शकते. यासाठी दूरसंचार विभागाच्या वेबसाइटची मदत घेऊ शकता.
-
वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत हे जाणून घेऊ शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे वापरत नसलेले सिम बंद करण्याची विनंती देखील करू शकता.
-
या सेवेला टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे. (Image: Pixabay)
-
ही सेवा अद्याप संपूर्ण देशात उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Reuters)
-
तुमच्या आधारवर जारी केलेले सिम कार्ड तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in वर जावे लागेल.
-
येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देऊन ओटीपीसाठी विनंती करावी लागेल. तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी पाठवला जाईल. ते प्रविष्ट करा आणि ते सत्यापित करा. पुढील पेजवर तुम्हाला आधार क्रमांकासह नोंदणीकृत सर्व मोबाइल क्रमांक दाखवले जातील.
-
जर तुम्हाला एखाद्या सिमबद्दल वाटत असेल की ते तुमचे नाही किंवा तुम्हाला कोणतेही सिम बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्या नंबरच्या शेजारी टिक आणि चिन्हांकित करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.
तुमचा आधार UDI क्रमांक किती SIM कार्डशी लिंक आहे?; जाणून घ्या या सोप्या स्टेप्समध्ये
आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत, हे देखील आपल्याला माहिती नसते.
Web Title: How many sim cards are linked to your aadhaar udi number know these simple steps rmt