-

करोना वायरसच्या संकटामुळे सामान्यांचं जनजीवन पूर्णपणे बदलून गेलंय. यामुळे आपल्याला वैयक्तिक जीवनात अनेक बदल करावे लागले आहेत.
-
ऑफिसच्या कामांपासून बाजारात जाण्यापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. लॉकडाउनमुळे अनेक लोक वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातूनच ऑफिसचे काम करत आहेत.
-
अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या यासाठी ऑफीसमधूनच लॅपटॉप पुरविले आहेत.
-
अशात ऑफिसच्या लॅपटॉपवर अनेकांनी आपली वैयक्तिक कामे सुरू केली आहेत. मग ते मुलांच्या शाळेचे ऑनलाईन क्लासेस असो वा मग आपले खाजगी डॉक्यूमेंट्स तयार करणे असो…पण तुम्ही सुद्धा असंच करत असाल तर कळत नकळत तुम्ही अडचणीत येऊ शकता.
-
अनेकजण आपल्या ऑफिसच्या लॅपटॉरवर काम करता करता दुसऱ्या टॅब्सवर शिफ्ट दरम्यान नोकऱ्या शोधत असतात. पण हे लक्षात असू द्या की, काही प्रकरणांमध्ये तुमच्या ऑफिसची आयटी टीम तुमच्या कामावर लक्ष ठेवत असते. अशा परिस्थितीत टीमला कळू शकतं की तुम्ही दुसरी नोकरी शोधत आहात. त्यामुळे ऑफिस सिस्टीममधून जॉब शोधणे किंवा तुमचा बायोडाटा कुठेतरी पाठवणे ही दोन्ही कामे टाळा.
-
काही जण ऑफिसच्या लॅपटॉपवर आपले काही खाजगी डॉक्यूमेंट्स तयार करतात. काही जण वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवतात. पण चुकूनही असं करू नका. कारण यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका जास्त असतो.
-
बर्याच कंपन्यांचे स्वतःचे चॅट प्रोग्राम आहेत जिथे ते इतर कर्मचार्यांशी जोडलेले राहतात. सोबतच अनेक जण त्यावर ग्रुप तयार करून ऑफिसमधील इतर लोकांबाबत गॉसिपींग करताना दिसून येतात. अशी कृत्ये करणेही चुकीचे मानले जाते. हे तुम्हाला निंदकांच्या श्रेणीत टाकू शकतं.
-
काही जण काम सुरू असताना ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये गुगलवर काही माहिती शोधतात, जी आक्षेपार्ह असते. काही लोक तर ऑफिसच्या लॅपटॉपवर पॉर्न सुद्धा पाहतात, त्यांनी हे अजिबात करू नये. अशी कोणतीही लिंक ओपन करू नये ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काय सर्च करत आहात याची माहिती ऑफिसच्या आयटी टीमला असते. म्हणूनच तुम्ही अशा कोणत्याही वेबसाइटचा शोध घेऊ नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल.
-
ऑफिस लॅपटॉप ही कंपनीने दिलेली सुविधा आहे. ज्याचा काही लोक चुकीचा फायदा घेतात. अशा स्थितीत भविष्यात या गोष्टींकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. (All Photos : Freepik)
ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये काम करताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा…
ऑफिस लॅपटॉप ही कंपनीने दिलेली सुविधा आहे. ज्याचा काही लोक चुकीचा फायदा घेतात. अशा स्थितीत भविष्यात या गोष्टींकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे.
Web Title: Things you shouldnt do or search in your office laptop otherwise you will regret later prp