-
अॅपलने बुधवारी त्यांच्या फार आउट इव्हेंटमध्ये नवीन आयफोन १४ सीरीजची घोषणा केली. नवीन आयफोन मॉडेल त्यांच्या मागील मॉडेल्सपेक्षा जास्त महाग नाहीत, हे जागतिक आर्थिक मंदी लक्षात घेता दिलासा देणारे आहे.
-
दरम्यान, जे लोक आयफोन १३ खरेदी करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी अॅपलने किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
-
भारतातील एक वर्ष जुन्या आयफोन १३ ची किंमत अधिकृतपणे कमी करण्यात आली आहे, जी लॉंचच्या किंमतीपेक्षा दहा हजार रुपयांनी कमी आहे.
-
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील सणासुदीच्या विक्रीदरम्यान आयफोन १३ वर चांगली सूट दिली जात आहे, यामुळे ग्राहकांना मूळ किमतीपेक्षा १५,००० रुपयांनी कमी किंमतीत डिव्हाइस मिळू शकते.
-
दरम्यान, कंपनी भारतातील त्यांच्या ऑनलाइन स्टोअरवर ७९,९०० रुपयांच्या लॉंच किमतीवर आयफोन १३ विकत होते.
-
आता अॅपल स्टोरवर अधिकृत सवलत दाखवण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्ही अॅपल स्टोरला प्राधान्य दिल्यास तुम्हाला आयफोन १३ वर दहा हजार रुपयांची सवलत मिळेल.
-
आता आयफोन १३ची किंमत ६९,९०० रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन १३ मिनी आता ६४,९०० रुपयांना मिळेल.
-
आयफोन १३ मिनी १२८जीबी – ६४,९०० रुपये.
-
आयफोन १३ मिनी २५६जीबी – ७४,९०० रुपये.
-
आयफोन १३ मिनी ५१२जीबी – ९४,९०० रुपये.
-
आयफोन १३, १२८जीबी – ६९,९०० रुपये.
-
आयफोन १३, २५६जीबी – ७९,९०० रुपये.
-
आयफोन १३, ५१२जीबी – ९९,९०० रुपये.
-
अॅपलने भारतात आयफोन १२ च्या किमतीतही कपात केली आहे. आयफोन १२ ची किंमत आता ५९,९०० रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन १२ मिनी बंद करण्यात आला आहे.
-
आयफोन १२ मिनीची पूर्वीची किंमत ६४,९०० रुपये होती तर आयफोन १२ ची किंमत ६९,९०० रुपये होती. आयफोन १२ दोन वर्षांपूर्वी आयफोन १४च्या किमतीत लॉंच करण्यात आला होता. (सर्व फोटो : Apple)
Photos : iPhone 14 लाँच होताच iPhone 13च्या किंमतीमध्ये मोठी घट! किंमत वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही
जे लोक आयफोन १३ खरेदी करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी अॅपलने किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
Web Title: After launch of iphone 14 the price of iphone13 is greatly reduced you wont believe pvp