-
विल्यम्सबर्ग, न्यूयॉर्क येथे ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘मेड बाय गूगल’ या इव्हेंटमध्ये गूगलकडुन पिक्सेल ७ सिरीज २, गूगल स्मार्टवॉच आणि इतर लेटेस्ट प्रोडक्ट लाँच करण्यात येणार आहेत. या इव्हेंटमध्ये लाँच होणारे प्रोडक्ट आणि त्यांचे फीचर्स, किंमत जाणून घ्या
-
Google 7 Series : टेन्शर जी२ चिपसेटमुळे गूगल पिक्सेल ७ सिरीज अधिक पॉवर असणारी ठरणार आहे. मागच्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या पिक्सेल ६, पिक्सेल ६ प्रो आणि पिक्सेल ६ए ला पॉवर करणार्या टेन्सर चिपनंतर कंपनीचा हा दुसरा इन-हाउस प्रोसेसर असेल.
-
Google Pixel 7 and Pro : वॅनिला पिक्सेल ७ ची किंमत सुमारे ४८,६०० रुपये, तर पिक्सेल ७ प्रो ची किंमत सुमारे ७२,९०० रुपये पासून सुरू होईल. पिक्सेल ७ आणि ‘७ प्रो’ला पिक्सेल ६ आणि ‘६ प्रो’च्या सुधारित आवृत्त्या म्हणता येतील. यामध्ये अधिक उत्तम थर्मल, कनेक्टिव्हिटी आणि फिंगरप्रिंट परफॉरमन्स असेल. स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १३ सह ६.३० इंच स्क्रीन असेल. तसेच यात गूगल टेन्शर सेंसर असेल.
-
Google Pixel Watch : गूगलने त्याच्या पहिल्या स्मार्टवॉच, ‘पिक्सेल वॉच’चा एक नवीन व्हिडिओ टीझर रिलीज केला आहे. जो स्मार्टफोनबरोबर लाँच केला जाईल. पिक्सेल स्मार्टवॉच हे लक्षवेधी, विशिष्ट डिझाइन असणारे प्रीमियम घड्याळ असेल.
-
Google nest home appliances : याव्यतिरिक्त गूगल नेस्ट स्मार्ट होमलाइनसाठी नवीन प्रोडक्ट लाँच करणार आहे. प्रत्येक डिव्हाइस त्याच दिवशी GoogleStore.com वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. जर तुम्ही न्यूयॉर्क शहराच्या जवळ राहत असाल, तर तुम्ही वैयक्तिकरित्या डिव्हाइस पाहण्यासाठी तेथील गूगल स्टोअर्सपैकी एका स्टोरला भेट देऊ शकता. अशी माहिती कंपनीकडुन देण्यात आली.
-
Google’s flagship TWS Earbuds : एक सॉफ्टवेअर अपडेट लवकरच गूगलच्या पिक्सेल बड्स प्रो इयरबड्समध्ये दोन नवीन फीचर्स जोडू शकते. ज्यात पाच-बँड इक्वेलायझर आणि व्हॉल्यूम बॅलेंसिंग समाविष्ट असणार आहे. (फोटो सौजन्य : गूगल स्टोर, इंडियन एक्सप्रेस, गूगल पिक्सेल इन्स्टाग्राम)
‘मेड बाय गूगल’ इव्हेंटमध्ये लाँच होणार ‘गूगल पिक्सेल ७’, ‘पिक्सेल प्रो’ सारखे अनेक प्रोडक्ट; पाहा यादी
Web Title: Google pixel pixel 7 pro and other latest products to launch on 6 october know list and price pns