• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. easy tricks to make your mobile data last longer follow these easy steps pdb

Photos: तुमच्याही फोनचा डेटा लवकर संपतो? मग ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टेंशन फ्री!

Tips and Tricks: आज फोनचा अधिक वापर म्हणजे इंटरनेटचा अधिक वापर. अशा परिस्थितीत, जर तुमच्या फोनमधील इंटरनेट डेटा लवकरच संपत असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक उत्तम युक्ती सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही मोबाईल इंटरनेट डेटा बराच काळ वापरु शकता. जाणून घ्या अशाच काही आश्चर्यकारक टिप्स बद्दल.

November 20, 2022 14:38 IST
Follow Us
  • Smartphone
    1/12

    आजकाल इंटरनेटशिवाय कोणतही काम होत नाही. दिवसभरासाठी मिळालेला डेटा संपण्याची सगळ्यांना भीती असते. मोबाईलमधील प्रत्येक App मोबाईल डेटा खात असतं. त्यामुळे दिवसभरातील डेटा संपल्यानंतर आपली अनेक कामे अडून राहतात.

  • 2/12

    त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हा डेटा वाचवण्याच्या काही टिप्स सांगणार असून या टिप्सच्या मदतीने तुम्ही डेटा मोठया प्रमाणात वाचवू शकता.

  • 3/12

    डेटा सेव्ह करण्यासाठी, तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही त्या अॅपचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा जे जास्त डेटा वापरते.

  • 4/12

    त्याच वेळी, अधिक जाहिराती दाखवणाऱ्या अॅपपासून अंतर ठेवा. हे अॅप्स तुमचा बराचसा डेटा वापरतात.

  • 5/12

    यासोबतच अनेक वेळा असे घडते की आपण मोबाईल चालवण्यात इतके मग्न होऊन जातो की आपल्याला डेटाची पर्वा नसते आणि डेटा संपल्यामुळे आपले महत्त्वाचे काम होऊ शकत नाही. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर रोजची मर्यादा सेट करू शकता.

  • 6/12

    तुम्ही तुमच्या स्वतःच्या नुसार दैनंदिन डेटाची मर्यादा सेट करू शकता. हा डेटा संपताच तुम्हाला एक सूचना मिळेल आणि इंटरनेटही बंद होईल.

  • 7/12

    त्याच वेळी, अॅपच्या ऑटो अपडेट वैशिष्ट्यामुळे, आपण खूप डेटा देखील वापरता. ते बंद करण्यासाठी, तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि केवळ WiFi वर ऑटो अपडेट अॅप्स ऑप्शन निवडा.

  • 8/12

    आजकाल अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, नेटफ्लिक्स यांसारख्या ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मची मागणीदेखील खूप वाढली आहे. अनेकदा ही Apps फोनमध्ये बॅकग्राऊंडला सुरूच राहतात आणि खूप जास्त प्रमाणात डेटा खातात. त्यामुळे ही App वापरून झाल्यानंतर बॅकग्राउंडवरून क्लिअर करणे गरजेचे आहे. त्यामुळे डेटा वाचेल.

  • 9/12

    गुगल मॅप्स या सेवेमध्ये सामान्यपणे जास्त डेटा जातो. त्यामुळे हा मॅप सेव्ह करून तुम्ही वापरू शकता. मॅप डाउनलोड झाल्यानंतर GPS च्या मदतीने तुम्ही ऑफलाईन याचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या डेटामध्ये मोठी बचत होऊ शकते.

  • 10/12

    फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही करत असाल तर तुमचा डेटा लवकर संपण्याची शक्यता आहे. तुमच्या या अ‍ॅपमध्ये ऑटो प्ले व्हिडीओ हा पर्याय बंद करून तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता.

  • 11/12

    डेटा मर्यादा सेट करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला डेटा वापराच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला Data Limit आणि Billing Cycle वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही डेटा सेट करू शकता.

  • 12/12

    फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स हे आपोआप अपडेट होत असतात. त्यामुळे फोनचा डेटा खूप जास्त प्रमाणात खर्च होतो. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ऑटो अपडेट बंद करावे लागेल. यामुळे तुम्ही तुम्हाला हवे असेल तेव्हा ते अ‍ॅप अपडेट करू शकता. यामुळे दिवसभर तुमचा डेटा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो.
    (फोटो सौजन्य – संग्रहित छायचित्र)

TOPICS
इंटरनेटInternetटिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And TricksमोबाइलMobile

Web Title: Easy tricks to make your mobile data last longer follow these easy steps pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.