• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. buy this best smartphone for less than 10 thousand rupees see the list pdb

Smartphones Under 10000: ‘स्वस्त आणि मस्त’ स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट फोन

Smartphones Under 10000: नवा फोन घेण्याचा विचार असेल, तर आज आम्ही तुम्हाला १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये येणारे दमदार आणि चांगले फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घ्या या दमदार स्मार्टफोनबद्दल.

December 4, 2022 11:14 IST
Follow Us
  • Moto E40: या स्मार्टफोनमध्ये ६.५ -इंच HD + IPS LCD आणि ९० Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAhची बॅटरी आहे. हा फोन ८५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
    1/15

    Moto E40: या स्मार्टफोनमध्ये ६.५ -इंच HD + IPS LCD आणि ९० Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAhची बॅटरी आहे. हा फोन ८५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

  • 2/15

    Redmi 10A: या फोनमध्ये ६.५३ इंच HD+डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनमध्ये १३ MP रियर कॅमेरा आणि ५ MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन ५००० mAh बॅटरीने सुसज्ज आहे. Redmi 10A हा १० हजारांपेक्षा कमी किमतीचा फोन मानला जातो. या फोनची सुरुवातीची किंमत अमॅझॉनवर ८९९९ रुपये आहे.

  • 3/15

    Infinix Hot 11S: या फोनमध्ये, कंपनी ६.७८ इंच फुल एचडी + डिस्प्ले देत आहे. कंपनीचा हा फोन ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन ९४९९ रुपयांना खरेदी करता येईल.

  • 4/15

    Lava Blaze: या फोनमध्ये ६.५-इंच स्क्रीनसह HD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात १३ मेगापिक्सलचा मुख्य रिअर एआय कॅमेरा असून २ मेगापिक्सलचा दुसरा आणि तिसरा VGA कॅमेरा आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे. हा फोन 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. फ्लिपकार्टमध्ये फोनची किंमत ८,६९९ रुपये आहे.

  • 5/15

    Micromax In 2b: या स्मार्टफोनमध्ये ४०० nits पीक ब्राइटनेससह ६.५२ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे ६ GB पर्यंत रॅम आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेज प्रदान करण्यात आला आहे. यात १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सेलच्या दुय्यम कॅमेरा सेन्सरच्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन ६९९९ रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.

  • 6/15

    Samsung Galaxy A03: या फोनमध्ये ६.५-इंच स्क्रीनसह HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. यात ४८ MP मेन रियर कॅमेरा आणि २ MP सेकंड डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. यात ५००० mAh बॅटरी आहे. हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे.

  • 7/15

    Infinix Smart 5A: या फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ एलसीडी आयपीएस इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. हा फोन ७१९९ रुपयांना खरेदी करता येईल.

  • 8/15

    Motorola G8: लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोला बजेट फोन मोटोरोला G8 पावर लाइटमध्ये ५००० mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी शूटसाठी वॉटर-ड्ऱॉप नॉचसह ६.५ इंचाचा HD+डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अॅड्रॉईड 9 देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सध्या बाजारात किंमत ८,९९९ रुपये इतकी आहे.

  • 9/15

    Nokia C01: नोकियाच्या या फोनमध्ये ५.४५-इंच स्क्रीनसह HD+ डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्लॅशसह ५ MP सिंगल बॅक कॅमेरा आहे. यात २ एमपी फ्रंट कॅमेरा आहे. यात ३०००mAh बॅटरी आहे. Amazon वर, फोनच्या २ GB RAM, १६ GB इंटरनल स्टोरेजची किंमत ५,०९९ रुपये आणि २ GB रॅम, ३२ GB इंटरनल स्टोरेजची किंमत ५,७९९ रुपये आहे.

  • 10/15

    Realme 5S: या फोनचा बेस व्हेरिएंट ३GB रॅम आणि ३२GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये ५००० mAh ची शानदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ चिपसेट देण्यात आला आहे. आता या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये इतकी आहे.

  • 11/15

    Realme C31: या स्मार्टफोनमध्ये ६.५२ -इंचाचा LCD डिस्प्ले आहे आणि तो १३ -मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. स्टँडबायवर ४५ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ ऑफर करते. हा फोन स्वस्तात एक चांगला पर्याय आहे. फोन ८९९० रुपयांना खरेदी करता येईल.

  • 12/15

    Realme Narzo 10A: या फोनमध्ये 12 nm ऑक्टा-कोअर मीडियाटेक Helio G70 द्वारे संचलित आहे. फोनमध्ये ३GB आणि ३२GB स्टोरेज असे व्हेरिएंट आहेत. हा २.०GHz पर्यंत स्पीड क्लॉक करु शकतो. भारतात याची किंमत ८,४९९ रुपयांच्या घरात आहे.

  • 13/15

    Redmi 8: या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४३९ चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ४GB रॅम आणि ६४GB स्टोरेज उपलब्ध आहे. तर ५००० mAh ची बॅटरी आणि ६.२२ इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. रेडमी 8 हा स्मार्टफोन ९,४९९ रुपयांत उपलब्ध आहे.

  • 14/15

    Tecno Spark 9: या फोनमध्ये ६.६ इंच HD+ डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी यामध्ये Helio G37 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटो आणि व्हिडिओसाठी, या फोनमध्ये १३ MP रियर कॅमेरा आणि ८ MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन ५००० mAh बॅटरीने सुसज्ज आहे. या फोनची किंमत अमॅझॉनवर ७९९९ रुपये आहे.

  • 15/15

    Vivo Y16: हा बजेट सेगमेंटमध्ये चांगला फोन आहे. यात ६.५१ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. पॉवरसाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी, १३ MP + २ MP रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, ५ MP सेल्फी कॅमेरा सुद्धा यात देण्यात आला आहे. या फोनच्या ३GB + ३२GB व्हेरिएंटची किंमत अॅमेझॉनवर ९९९९ रुपये आहे. (फोटो सौजन्य : Loksatta / Indian express / Jansatta )

TOPICS
ऑफरOfferतंत्रज्ञानTechnologyस्मार्टफोनSmartphone

Web Title: Buy this best smartphone for less than 10 thousand rupees see the list pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.