-
आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आणि इतर काही मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं. बुधवारी त्याकरताच मुंबई बंदची हाकही देण्यात आली होती. ज्याचे पडसाद मुंबापुरीच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळाले. आंदोलकांनी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेला निशाणा करत रेल रोको करत आपला संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
-
सकाळपासून या आंदोलनाला ठाण्यातून हिंसक वळण मिळण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. ठाणे रेल्वे स्थान परिसरापासून तीन हात नाक्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
-
कल्याणच्या शिवाजी चौकातही मराठा क्रांती मोर्चा पाहता दुकानं बंद ठेवण्यात आली.
-
नवी मुंबई येथेसुद्धा महामार्गावर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. ज्यामुळे वाहन चालकांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता.
-
कांदिवली समता नगर येथे मराठा आरक्षण आंदोलकांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग रोखून धरला होता.
-
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )
-
नवी मुंबईतील माईंड स्पेस येथे असणाऱ्या कार्यालयांच्या इमारतींजवळही मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केल्या
-
ज्यानंतर परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी काही कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
-
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जागोजागी पोलीस यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्या होत्या.
-
घनसोली येथे रेल्वे रुळांवर आंदोलकांची गर्दी.
-
घोषणाबाजीच्या या सत्रामध्ये शासनावर निशाणा साधण्यात आला.
MARATHA KRANTI MORCHA : आता खुप झालं, म्हणत मोर्चेकरी आक्रमक
Web Title: Mumbai thane ghansoli kalyan bandh maratha reservation demand mumbai maratha kranti morcha