• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. unseen photos of vinoba bhave

विनोबा भावे म्हणजे ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’

११ सप्टेंबर १८९५ आचार्य विनोबा भावे यांचा कोकणातील गागोदे येथे जन्म.

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • विनोबा भावे यांची आज जयंती. ११ सप्टेंबर १८९५ आचार्य विनोबा भावे यांचा कोकणातील गागोदे येथे जन्म. ‘गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ अशी दोन विशेषणे विनोबांना लावण्यात येतात. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. गांधीजींच्या सत्याग्रहाचा विकास विनोबांनी सवरेदयात केला आणि ग्रामस्वराज्य कल्पना ग्रामदानापर्यंत आणली. जनतेच्या हृदयाला आवाहन करीत लाखो एकर जमीन भूमिहीनांना मिळवून देण्याचा ऐतिहासिक प्रयोग जगात फक्त विनोबाच करू शकले. भगवद्गीतेचे सार असलेल्या त्यांच्या ‘गीताई’ या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक प्रस्थापित केले. कुराण, बायबल यांच्यावरील सारग्रंथही त्यांच्यातील प्रकांडपंडिताचे दर्शन घडवितात. भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतका गाढा अभ्यास असणारी व्यक्ती विरळाच! संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भातील विनोबांची भूमिका व आणीबाणीच्या संदर्भातील त्यांच्या भूमिकेचा करण्यात आलेला विपर्यास यामुळे जनतेचा व अनुयायांचा रोष ओढवूनही, स्वत:ला जे पटले त्याचेच आचरण करण्यात विनोबांनी कसूर केली नाही. पाहुयात विनोबांचे काही खास फोटो
    1/7

    विनोबा भावे यांची आज जयंती. ११ सप्टेंबर १८९५ आचार्य विनोबा भावे यांचा कोकणातील गागोदे येथे जन्म. ‘गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ अशी दोन विशेषणे विनोबांना लावण्यात येतात. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. गांधीजींच्या सत्याग्रहाचा विकास विनोबांनी सवरेदयात केला आणि ग्रामस्वराज्य कल्पना ग्रामदानापर्यंत आणली. जनतेच्या हृदयाला आवाहन करीत लाखो एकर जमीन भूमिहीनांना मिळवून देण्याचा ऐतिहासिक प्रयोग जगात फक्त विनोबाच करू शकले. भगवद्गीतेचे सार असलेल्या त्यांच्या ‘गीताई’ या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक प्रस्थापित केले. कुराण, बायबल यांच्यावरील सारग्रंथही त्यांच्यातील प्रकांडपंडिताचे दर्शन घडवितात. भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतका गाढा अभ्यास असणारी व्यक्ती विरळाच! संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भातील विनोबांची भूमिका व आणीबाणीच्या संदर्भातील त्यांच्या भूमिकेचा करण्यात आलेला विपर्यास यामुळे जनतेचा व अनुयायांचा रोष ओढवूनही, स्वत:ला जे पटले त्याचेच आचरण करण्यात विनोबांनी कसूर केली नाही. पाहुयात विनोबांचे काही खास फोटो

  • 2/7

    सन १९५६ला भूदान चळवळीदरम्यान विनोबा यांनी काढलेल्या पदयात्रेच्या स्वागतासाठी मद्रासचे मुख्यमंत्री कमाराज नाडर आले होते तो क्षण (फोटो: द हिंदू)

  • 3/7

    हरियाणा येथील सीरसामधील एका पदयात्रेदरम्यान ढोल वाजवताना विनोबा भावे

  • 4/7

    विनोबांची स्वाक्षरी

  • 5/7

    विनोबांचा फोटो असलेला पोस्टाचा स्टॅम्प. हा स्टॅम्प १९८३ साली १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला.

  • 6/7

    आग्रा येथे भाषण देताना विनोबा भावे (फोटो: Bettmann/CORBIS)

  • 7/7

    ११ मे १९५३ ला प्रकाशित झालेल्या टाइम या जगप्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर विनोबा भावेंचा फोटो होता.

Web Title: Unseen photos of vinoba bhave

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.