-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कल्याण आणि भिवंडीमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक केली. सभा संपल्यानंतर मुंबईच्या दिशेने परतताना राज यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला.
-
यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र अमित ठाकरे, ठाणे शहर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव, अभिनेते आणि दिग्दर्शक समीर पाटील आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.
-
मिसळीचा पहिलाच घास खाल्ल्यानंतर अमित ठाकरेंना मिसळ तिखट लागली. त्यावेळी राज यांनी तिखट लागली का असंही अमित यांना विचारले.
-
राज ठाकरे मामलेदारला आल्याचे समजताच हॉटेलबाहेर राज समर्थकांची मोठी गर्दी झाली.
-
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणारे मामलेदार हे ठाण्यातील सर्वाधिक लोकप्रिय मिसळ मिळण्याचे ठिकाण असून येथील मिसळीचा झणझणीतपणा हा अनेकांना आकर्षित करतो. राज यांच्या प्रमाणे अनेक दिग्गजांना येथील मिसळ आवडते.
-
मिसळ खाऊन झाल्यानंतर राज यांचा ताफा पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला.
…आणि राज ठाकरेंचा संपूर्ण ताफा ‘ही’ प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी ठाण्यात थांबला!
राज ठाकरे यांनी कल्याणवरुन मुंबईला जाताना आपला ताफा थांबवला आणि ठाण्यामध्ये मिसळीचा आस्वाद घेतला
Web Title: Mns chief raj thackeray stop in thane to test mamledar misal scsg