Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. last rites performed on senior actor dr shriram lagoo at pune raj thackeray and nana paterkar were present for last ritual ceremony scsg

राज ठाकरे, नाना पाटेकरांसहीत अनेक मान्यवरांनी घेतले श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन

शासकीय इतमामात डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर अंत्यसंस्कार करण्यात आले

December 20, 2019 18:00 IST
Follow Us
  • ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. डॉ. लागू नास्तिक असल्यामुळे कोणतेही धार्मिक विधी यावेळी झाले नाहीत. तत्पूर्वी बालंगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉ. लागू यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी लागू यांचे अंत्यदर्शन घेतले.
    1/12

    ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. डॉ. लागू नास्तिक असल्यामुळे कोणतेही धार्मिक विधी यावेळी झाले नाहीत. तत्पूर्वी बालंगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉ. लागू यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी लागू यांचे अंत्यदर्शन घेतले.

  • 2/12

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन घेतले.

  • 3/12

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी डॉ. श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन घेतले.

  • 4/12

    डॉ. लागू नास्तिक असल्यामुळे कोणतेही धार्मिक विधी यावेळी झाले नाहीत. तत्पूर्वी बालंगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मंगळवारी वयाच्या ९२व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

  • 5/12

    अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेही डॉ. श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन घेतले

  • 6/12

    अंत्यसंस्कारापूर्वी सकाळी १० वाजता येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात डॉ. लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

  • 7/12

    डॉ. लागू यांच्या पत्नी डॉ. दीपा लागू, पुत्र डॉ. आनंद लागू, बंधू विजय लागू यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. राज ठाकरे यांनी लागू कुटुंबियांचे सांत्वन केलं.

  • 8/12

    अंत्यसंस्काराच्या वेळी डॉ. लागू यांना अखेरचा निरोप देण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, सह-पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पुणे शहरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) अमृत नाटेकर, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, नाना पाटेकर, विजय केंकरे, राहुल सोलापूरकर, माधव वझे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत कुलकर्णी, नंदू माधव, सुधीर गाडगीळ, प्रसाद कांबळी, मेघराज भोसले, सुनील महाजन, पर्ण पेठे, ज्योती सुभाष, विवेक लागू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  • 9/12

    राज ठाकरे यांनी लागू कुटुंबियांचे सांत्वन केलं.

  • 10/12

    डॉ. श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ९ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना हा तन्वीर सन्मान प्रदान करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर त्यांचे पुत्र आनंद अमेरिकेला गेले होते ते परतल्यानंतर शुक्रवारी (२० डिसेंबर) डॉ. लागू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 11/12

    डॉ. लागू यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून डॉ. लागू यांना अखेरची मानवंदना दिली.

  • 12/12

    अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेही डॉ. श्रीराम लागू यांचे अंत्यदर्शन घेतले

Web Title: Last rites performed on senior actor dr shriram lagoo at pune raj thackeray and nana paterkar were present for last ritual ceremony scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.