• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. megablock between dombivli and kalyan stations scsg

डोंबिवलीची झाली ‘कोंडी’वली; मेगाब्लॉकमुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ

डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

December 25, 2019 13:10 IST
Follow Us
  • नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधत मध्य रेल्वेने आज ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. (फोटो सौजन्य: दिपक जोशी)
    1/12

    नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधत मध्य रेल्वेने आज ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. (फोटो सौजन्य: दिपक जोशी)

  • 2/12

    मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार आहे. मात्र मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे डोंबिवली ते ठाणे स्थानकांवरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून तुफान गर्दी झाली आहे.

  • 3/12

    मध्य रेल्वेने १० वाजण्याआधीच मेगाब्लॉक सुरु केल्याचं काही प्रवाशांचं म्हणणं असून स्थानकांवर कोणतीही घोषणा करण्यात येत नसल्याची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य: दिपक जोशी)

  • 4/12

    नाताळ सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने केडीएमटी प्रशासनाला विशेष बस सोडण्याची मागणी केली होती. (फोटो सौजन्य: दिपक जोशी)

  • 5/12

    एकूण चार तासांचा विशेष मेगाब्लॉक

  • 6/12

    मेगाब्लॉकमुळे १२४ लोकल, १६ लांब पल्ल्याच्या गाडय़ा चार तासांच्या अवधीत रद्द केल्या

  • 7/12

    हे काम आज सकाळी पावणेदहा ते दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. विनाअडथळा हे काम पूर्ण व्हावे यासाठी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी सव्वानऊ ते दुपारी दुपारी पावणेदोन कालावधीत बंद ठेवण्यात आली.

  • 8/12

    डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असून स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या लोकल नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. (फोटो सौजन्य: दिपक जोशी)

  • 9/12

    ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधून तयार आहे. या पुलावर सहा मीटर लांबीचे चार गर्डर शक्तिशाली क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात आले.

  • 10/12

    मेगाब्लॉकमुळे १२४ लोकल, १६ लांब पल्ल्याच्या गाडय़ा चार तासांच्या अवधीत रद्द करण्यात आल्या.

  • 11/12

    डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

  • 12/12

    प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेगा ब्लॉकच्या काळात ८७ विशेष लोकल कल्याण ते कर्जत-कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवली दरम्यान सोडल्या.

Web Title: Megablock between dombivli and kalyan stations scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.