कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त आज विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे) -
राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशभरातून भीमसागर विजयस्तंभाला अभिवादन कऱण्यासाठी उसळला होता (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे) पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे) महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे काही इतिहासकार म्हणतात. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे) विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते असेही संदर्भ दिले जातात. तरीही ‘महार रेजिमेंट’ने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केल्याचं सांगितलं जातं. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे) ‘महार रेजिमेंट’ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवल्याने अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर या समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत ‘महार रेजिमेंट’ने इंग्रजांना विजय मिळवून दिला.(एक्स्प्रेस फोटो – सागर कासार) अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. (एक्स्प्रेस फोटो – सागर कासार) कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत. (एक्स्प्रेस फोटो – सागर कासार) उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील अभिवादन करण्यासाठी सकाळीच पोहोचले होते (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे) -
यावेळी त्यांना विजयस्तंभाची प्रतिकृती देत सत्कार करण्यात आला (एक्स्प्रेस फोटो – सागर कासार) प्रकाश आंबेडकरदेखील अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते (एक्स्प्रेस फोटो – सागर कासार)
कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला भीमसागर
कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त आज विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडला
Web Title: 202nd anniversary of bhima koregaon war vijaystambh sgy