-
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात उमटू लागले आहेत.
-
हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मुंबई आयआयटीमध्येही विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला आहे. तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत जेएनयूतील हल्ल्याचा तीव्र निदर्शने केली. यावेळी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
राजकारण, विचारधारा कोणतीही असो, जर तुम्ही भारतीय असाल तर अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेता कामा नये. हल्ला करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी महिंद्रा यांनी केली. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शरद पवार, आनंद महिंद्रा आणि आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून जेएनयूतील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी मुंबईतील विविध संघटना निदर्शने करणार आहेत. हुतात्मा चौक येथे सायंकाळी ४ वाजता छात्र भारती, जॅक मुंबई आणि सर्व पुरोगामी संघटना आंदोलन करणार आहेत. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आज सायंकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी रविवारी रात्री जेएनयूच्या साबरमती हॉस्टलमध्ये घुसून विद्यार्थांवर प्राणघातक हल्ला केला. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
हिंसाचाराची जी दृष्ये समोर आली आहेत ती भीतीदायक आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित असण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
रविवारी रात्री जेएनयूच्या साबरमती हॉस्टलमध्ये घुसून विद्यार्थांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर यामध्ये जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
JNU Attack: आंदोलनांची रात्र; पाहा मुंबई-पुण्यातील आंदोलनाची क्षणचित्रे
मुंबई-पुण्यात विद्यार्थ्यांचे रात्रभर आंदोलने
Web Title: Night long protests at gateway of india mumbai and ftii pune condemning attack on students of jnu scsg