• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. udayanraje bhosale slams shivsena and ncp scsg

“यापुढे तोंडातून ब्र काढला तर…”; शिवसेना भवनाचे फोटो दाखवत उदयनराजे संतापले

पुण्यामधील पत्रकार परिषदेतून शिवसेना, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

January 14, 2020 13:54 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकासंदर्भात शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भूमिका मांडावी अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेचा उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (फोटो- आशिष काळे)
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकासंदर्भात शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भूमिका मांडावी अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेचा उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (फोटो- आशिष काळे)

  • 2/9

    छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदींशी करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाश काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडले. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शिवाजींच्या वंशजांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आज (मंगळवारी) पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

  • 3/9

    शिवसेना भवनावरुन टीका – पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे यांनी शिवसेनाचा भवनाचा फोटो दाखवत हे काय आहे असा सवाल उपस्थित केला. दादरमधील शिवसेना भवनावर असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या फोटोखाली छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मुर्ती आहे. यावरुनच उदयनराजे यांनी शिवसेना भवनाचा फोटो दाखवत सेनेवर निशाणा साधला. यापूर्वीही शिवसेनाभवनाच्या इमारतीवर बाळासाहेबांच्या भव्य फोटो समोर असणाऱ्या शिवरायांचा अर्धाकृती पुतळा काढण्याची मागणी झाली होती. (फोटो- आशिष काळे)

  • 4/9

    फोटो दाखवत काय म्हणाले उदयनराजे? – उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेना भवनचा फोटो दाखवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या फोटोंच्या जागेवरुन टीका केली. "यापुढे तोंडातून ब्र काढला तर ऐकून घेणार नाही. यांनी काहीही टीका करायची आणि उदयनराजेंनी ऐकून घ्यायची असं चालणार नाही," अशा शब्दांमध्ये उदयनराजेंनी तंबीच दिली.

  • 5/9

    शिवसेनेचा घेतला समाचार – "शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?;" असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. "सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी. शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं," असा टोला उदयनराजेंनी लगावला. (फोटो- आशिष काळे)

  • 6/9

    तर कोण येतं तुमच्याकडे? – "शिवसेनेमधून शिवाजी महाराजांचं नाव काढलं तर कोण पाहणार तुमच्याकडे? शिवेसनेचे नाव बदलून ठाकरे सेना ठेऊन पाहा कोण येतं तुमच्याकडे," असा टोला उदयनराजेंनी शिवसेनेला लगावला. (फोटो- आशिष काळे)

  • 7/9

    त्या राष्ट्रवादी आमदाराचेही फोटो दाखवले – या फोटोबरोबरच उदयनराजे यांनी विधानभवनात २२ नोव्हेंबर २०१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराचे फोटोही पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. हे फोटो दाखवताना, "हे सगळं चालतं का?" असा सवाल उदयनराजेंनी सध्या सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला. (फोटो- आशिष काळे)

  • 8/9

    कोणी केली होती ही वेशभूषा? – राष्ट्रवादी काँग्रसचे नागपूरचे आमदार प्रकाश गजभिये हे विधानभवनामध्ये डोक्यावर मुकूट, गळ्यात माळा, कपाळावर टिळा आणि भगव्या रंगांच्या राजेशाही वस्त्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या वेषात आले होते. (फोटो- आशिष काळे)

  • 9/9

    भाजपा सरकारच्या राज्यात कोणालाच न्याय मिळत नसून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार स्थानापन्न झालं त्याचा छत्रपतींचाच सरकारला विसर पडला असल्याने आपण या वेशभूषेमध्ये विधानभवनात आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Web Title: Udayanraje bhosale slams shivsena and ncp scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.