• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. nashik bus and rickshaw accident 25 dead sgy

६० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली बस आणि रिक्षा, २५ जण ठार

नाशिक जिल्ह्यतील देवळा-मालेगाव मार्गावर भीषण अपघात

January 29, 2020 10:05 IST
Follow Us
    • देवळा-मालेगाव मार्गावर मंगळवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि रिक्षा यांच्यात टक्कर होऊन विचित्र अपघात झाला.
    • देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेथी फाटय़ानजीक दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला
    • रिक्षापाठोपाठ बसही सुमारे ६० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली
    • यामुळे रिक्षातील प्रवासी बसखाली दबले गेले
    • या अपघातात २५ जण ठार झाले आहेत.
    • जवळपास ३४ जण अपघातात जखमी आहेत.
    • सायंकाळी क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा विहिरीतून रिक्षा बाहेर काढण्यात आली.
    • अपघातानंतर बचावकार्य करणाऱ्या नागरिकांनी आसनांच्या सहाय्याने शिडी तयार केली होती
    • दोऱ्या बांधून पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही वेळाने तीन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या.
    • बस बाहेर काढल्याशिवाय रिक्षातील प्रवाशांच्या स्थितीचा अंदाज येत नव्हता. बस इतक्या विचित्र पद्धतीने अडकली होती, की तिला बाहेर काढताना अनेक अडचणी आल्या.
    • कल्पना योगेश वन्से, शिवाजी रुपला गावित, चंद्रभागाबाई उगले, अंकुश संपत निकम, अलका दिगंबर मोरे, शीतल अमोल अहिरे, रघुनाथ मेतकत, प्रकाश बच्छाव, शांताराम चिंधा निकम या एसटीतील नऊ मृत प्रवाशांची ओळख पटली. अजीज नथु मन्सुरी, हजराबाई अजीज मन्सुरी, अन्सारभाई मन्सुरी, शाहिस्ता शकीन मन्सुरी, शाहीन अन्सारभाई मन्सुरी, जावेद अन्सारभाई मन्सुरी, कुर्बान दादाभाई मन्सुरी, ज्ञानेश्वर शांतीलाल सुर्यवंशी आणि फारूख भिकन मन्सुरी अशी रिक्षातील मृतांची नावे आहेत.
    • अपघातात बसमधील जखमींमध्ये कमलबाई पवार (५०), दादाभाऊ ह्य़ाळीज (४०), धोंडू जाधव (६०), कल्पनाबाई जाधव (५०), कमल राऊत-वाहक (४२, कळवण), अमोल पाटील (३१), अनिता पाटील (२५), आयुष पाटील (५), आदित्य पाटील (साडेतीन वर्षे) आदींचा समावेश आहे. या नऊ जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    • नाशिकजवळ झालेला अपघात दुर्दैवी आहे. या अपघाताची माहिती महामंडळ स्तरावर घेण्यात येत आहे. जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसंच जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
    • अपघात कसा? मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील कुटुंबीय सोयरिक जुळवण्यासाठी रिक्षातून देवळा परिसरात आले होते. ते परत मालेगावकडे रिक्षाने निघाले असताना मालेगावकडून कळवणकडे जाणाऱ्या भरधाव बसने रिक्षाला टक्कर दिली. ती इतकी जोरदार होती की दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.
    • 1/15

Web Title: Nashik bus and rickshaw accident 25 dead sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.