• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai metro 3 silver jubilee breakthrough worli shivsena aditya thackeray sgy

मुंबई मेट्रोची Silver Jubilee, वरळीत २५ व्या भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण

मेट्रो 3 प्रकल्पाच्या २५ व्या भुयारीकरणाचा टप्पा आज वरळीत पूर्ण झाला.

January 29, 2020 16:12 IST
Follow Us
    • मेट्रो 3 प्रकल्पाच्या २५ व्या भुयारीकरणाचा टप्पा आज वरळीत पूर्ण झाला. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • मुंबई मेट्रो – 3 ही (कुलाबा ते सीप्झ) देशातील पहिली भुयारी मेट्रो आहे. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • वरळी सायन्स सेंटरपासून दूरदर्शन या अतिशय वर्दळीच्या परिसरात २.७ किलोमीटरचा पहिला टप्पा आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडला. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • मुंबईच्या उदरात जवळपास ६० ते ७० मीटर खोल हे भुयारीकरणाचं काम सुरू आहे. भुयार खोदणाऱ्या या एका टीबीएमचं वजन साधारण ४०० टन आहे.
    • टीबीएम जेव्हा ठरवलेल्या भुयारी मार्गावर खोदकाम पूर्ण करते त्याला ब्रेकथ्रू म्हणतात (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • टीबीएमला २४ सप्टेंबर २०१८ रोजी पहिला ब्रेक थ्रू मिळाला होता.
    • कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्गाच्या १३ स्थानकांचे १०० टक्के खोदकाम पूर्ण झाले. उर्वरित १३ स्थानकांचे खोदकाम यावर्षीच्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल.
    • या संपूर्ण भुयारी मार्गावर एकूण २६ स्थानके असून स्थानकांचे एकूण ८७ टक्के खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • मेट्रो ३ साठी ग्राऊंड ब्रेकिंगला २०१६च्या अखेरीस सुरुवात झाली. त्यांतर दोन वर्षांत खोदकामानंतर अन्य कामांना वेग आला आहे. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • ‘सध्या सुरू असलेल्या स्थानकांच्या कामाला आणखी गती प्राप्त होईल. उर्वरित स्थानकांचे खोदकाम युद्धपातळीवर सुरू असून पुढील तीनचार महिन्यात ते पूर्ण होईल.’ असे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले आहे.
    • उर्वरित स्थानकांपैकी सांताक्रूझ स्थानकाचे खोदकाम ९३ टक्के पूर्ण झाले असून दादर, शीतलादेवी, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल या स्थानकांचे खोदकाम ८० टक्क्य़ांहून अधिक पूर्ण झाले आहे. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या ३२ टप्प्यांपैकी २४ टप्प्यांचे भुयारीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित भुयारीकरण सप्टेंबरअखेर पूर्ण होईल. मार्गिकेच्या शेवटच्या पॅकेजचे भुयारीकरण संपूर्णपणे पूर्ण झाले आहे. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)
    • १०० टक्के खोदकाम पूर्ण झालेली स्थानके कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, एमआयडीसी, मरोळ नाका, सहार रोड, सीएसएमआयए-आंतरदेशीय, सीएसएमआयए-आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – मुंबई मेट्रो ट्विटर)

Web Title: Mumbai metro 3 silver jubilee breakthrough worli shivsena aditya thackeray sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.