• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. harekala hajabba the orange seller from karnataka who won padma shri sas

संत्री विकून केवळ १५० रुपये कमावणाऱ्याला ‘पद्मश्री’, कारण…

एकेदिवशी एक परदेशी दामप्त्य संत्री घेण्यासाठी त्यांच्याकडे आले, पण….

February 4, 2020 14:02 IST
Follow Us
  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 7 दिग्गजांना पद्मविभूषण, 16 मान्यवरांना पद्मविभूषण आणि 118 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने हे पुरस्कार प्रदान केले. भारत सरकारकडून कर्नाटकातील हरेकाला हजाब्बा यांनाही पद्मश्री प्रदान करण्यात आला. (छाया सौजन्य - ट्विटर )
    1/15

    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 7 दिग्गजांना पद्मविभूषण, 16 मान्यवरांना पद्मविभूषण आणि 118 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने हे पुरस्कार प्रदान केले. भारत सरकारकडून कर्नाटकातील हरेकाला हजाब्बा यांनाही पद्मश्री प्रदान करण्यात आला. (छाया सौजन्य – ट्विटर )

  • 2/15

    हरेकाला हे एक फळविक्रेते असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी वातावरण कसं निर्माण करता येईल यासाठी ते सतत काम करतात. फळविक्री करत असल्याने हजाब्बा यांना भाषेचं ज्ञान असणं आवश्यक. पण, एकदा एक परदेशी दाम्पत्य हरेकाला यांच्याकडे संत्री विकत घेण्यासाठी आले होते. मात्र हरेकाला यांना केवळ स्थानिक भाषा येत असल्याने भाषेच्या अडचणीमुळे त्यांना परदेशी दाम्पत्याची भाषा समजली नाही. (छाया सौजन्य – ट्विटर )

  • भाषा न समजल्याने ते दाम्पत्य संत्री न खरेदी करताच निघून गेलं. या घटनेचं हरेकाला यांना खूप वाईट वाटलं. विक्री झाली नाही यापेक्षा आपण इंग्रजीत संवाद साधू शकलो नाही याचं त्यांना वाईट वाटलं. (छाया सौजन्य – ट्विटर )
  • त्यानंतर आपल्या गावात प्राथमिक शाळा असणं गरजेचं असल्याची जाणीव त्यांना झाली. तसेच येणाऱ्या पिढीला अशा गोष्टीचा सामना करावा लागू नये यासाठी शाळा उभारण्याची गरज वाटली. (छाया सौजन्य – ट्विटर )
  • 3/15

    दिवसभर संत्री विकून अवघे १५० रुपये कमावणाऱ्या हजब्बा यांनी पैसे साठवायला सुरूवात केली. (छाया सौजन्य – ट्विटर )

  • पैसे साठवून त्यांनी ज्या गावात शाळा नव्हती तिथे लहान मुलांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उभारली आहे. (छाया सौजन्य – ट्विटर )
  • मँगलोर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांची जीवनगाथा नमूद केली आहे. सुरुवातीला केवळ २८ विद्यार्थी त्यांच्या शाळेत यायचे. पण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर जागेची कमतरता जाणवू लागली. (छाया सौजन्य – ट्विटर )
  • 4/15

    त्यामुळे त्यांनी नवीन शाळेसाठी अजून पैसे साठवले आणि एक लहानशी शाळा बांधली गेली. एवढेच नाही तर सध्या ते विश्वविद्यालय उभारण्याच्या तयारीत आहे. (छाया सौजन्य – ट्विटर )

  • 5/15

    हजब्बा २०१२ पासून आपल्या गावात महाविद्यालय सुरू करण्यासाठी झटत आहेत. सरकारकडे त्यांनी तशी मागणीही केली आहे. लवकरच त्यांचं हे स्वप्नदेखील पूर्ण होईल अशी त्यांना आशा वाटते. (छाया सौजन्य – ट्विटर )

  • गृह मंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला. पुरस्कार जाहीर झाला यावर विश्वासच बसत नाही. पद्मश्री पुरस्कार मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. खूप आनंद झाला आहे' अशी प्रतिक्रिया हरेकाला हजाब्बा यांनी दिली आहे. (छाया सौजन्य – ट्विटर )
  • गावापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या जिल्हा पंचायत कार्यालयात जाऊन ते अधिकाऱ्यांची भेट घेतात तसेच शैक्षणिक सुविधांचीही माहिती घेतात. (छाया सौजन्य – ट्विटर )
  • स्वतःच्या शाळेत साफसफाई ते विद्यार्थ्यांसाठी उकळलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय ते करायचे.(छाया सौजन्य – ट्विटर )
  • 6/15

    हरेकाला यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि त्यांनी गावकऱ्यांना समजावलं. (छाया सौजन्य – ट्विटर )

  • 7/15

    68 वर्षीय हरेकाला हजाब्बा हे मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.(छाया सौजन्य – ट्विटर )

  • आपल्याला जे मिळालं नाही ते गावातल्या इतरांना मिळावं या एकमेव हेतूने हजब्बांची खटपट सुरू आहे.( छाया सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

Web Title: Harekala hajabba the orange seller from karnataka who won padma shri sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.