• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. three men tried to sell a three star hotel sitting in its lobby sas

3-Star हॉटेलमध्ये बसून तेच हॉटेल विकण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रंगेहाथ केली अटक

याच हॉटेलच्या लॉबिमध्ये बसून सुरू होती हॉटेल विकण्याबाबत वाटाघाटी…

February 6, 2020 10:02 IST
Follow Us
    • एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी घटना चेन्नईमध्ये उघडकीस आली आहे. वाचा ही संपूर्ण घटना… (सर्व छायाचित्र सौजन्य : हॉटेल अंबिका एंपायर फेसबुक पेज, ambicaempire.com आणि in.hotels.com)
    • 1/15

      एका थ्री-स्टार हॉटेलचे मालक असल्याची बतावणी करुन त्याच हॉटेलमध्ये बसून आणि तेच हॉटेल विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव पोलिसांनी हाणून पाडला व तिघांना रंगेहाथ अटक केली.

    • हॉटेलच्या लॉबिमध्ये हॉटेल विकण्याबाबत वाटाघाटी सुरू असतानाच चेन्नई पोलिसांनी त्यांना बेड्या घातल्या.
    • करुणाकरण (वय-७०), परमानंधम(वय-५५) आणि दक्षिणामूर्ती(वय-६०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
    • 2/15

      सोमवारी वडपलनी येथील 'हॉटेल अंबिका एंपायर'च्या (Hotel Ambica Empire)लॉबिमध्ये बसून तेच हॉटेल विकण्याबाबत वाटाघाटी सुरू असताना त्यांना अटक करण्यात आली.

    • 3/15

      आरोपींनी खरेदीदारांकडून हॉटेलसाठी तब्बल १६५ कोटी रुपयांची मागणी केली होती.

    • 4/15

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी केरळच्या एका खासगी फर्मला संपर्क साधून हॉटेलचे मालक असल्याचे सांगितले आणि कर्ज फेडण्यासाठी हॉटेल विक्रीला काढल्याचे कारण दिले.

    • 5/15

      त्यानंतर खरेदीसाठी खासगी फर्मचे काही माणसे हॉटेलमध्ये आली. खरेदीदारांसाठी आरोपींनी हॉटेलमधीलच एक स्पेशल रुम बुक केली.

    • खरेदीदारांना संपूर्ण हॉटेल फिरवण्यात आलं, हॉटेलच्या सगळ्या खर्चाची, तेथील कर्मचाऱ्यांची इ. सर्व माहिती देण्यात आली.
    • 6/15

      पण, त्यांच्यातील हे संभाषण हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने ऐकलं आणि हॉटेलच्या मॅनेजरला सतर्क केलं.

    • 7/15

      मॅनेजरने तातडीने वडपलनी पोलिसांना संपर्क साधला.

    • 8/15

      तातडीने पोलिसांनी हॉटेलमध्ये धाव घेतली आणि तिघांना खोट्या कागदपत्रांसह रंगेहाथ अटक करण्यात आली.

    • 9/15

      पोलिसांनी त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 420, 419 आणि 511 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

    • 10/15

    • 11/15

      एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे घडलेली ही घटना बरीच चर्चेत आहे.

Web Title: Three men tried to sell a three star hotel sitting in its lobby sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.