Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. valentines week 2020 impress your love with these horoscope tips rose color significance nck

कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाचे गुलाब ठरते फायदेशीर, जाणून घ्या

आजपासून ‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात झाली

February 7, 2020 16:31 IST
Follow Us
  • तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा प्रेमाचा सप्ताह (व्हॅलेंटाइन वीक) आजपासून सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय.
    1/15

    तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा प्रेमाचा सप्ताह (व्हॅलेंटाइन वीक) आजपासून सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय.

  • 2/15

    १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’पूर्वीचा हा आठवडा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि Rose Day ‘रोझ डे’ने त्याची सुरुवात होते

  • 3/15

    प्रेमाचं प्रतिक असलेला गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. या निमित्ताने राशीनुसार तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराला कोणत्या रंगाचा गुलाब दिल्यास फायदेशीर ठरेल, हे जाणून घेऊयात.

  • मेष- या राशीवर मंगळचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे त्यांना लाल रंगाचा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
  • वृषभ- या राशीच्या व्यक्तींवर शुक्राचा प्रभाव असल्याने त्यांना गुलाबी रंगाचा गुलाब देणं योग्य ठरेल.
  • मिथुन- या राशीच्या व्यक्तींवर बुधचा प्रभाव अधिक असल्याने त्यांना आकर्षक गुलाबाची फुलं म्हणजेच लाल किंवा इतर गडद रंगाची फुलं भेट म्हणून द्यावीत.
  • कर्क- कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्याने त्यांना पांढरा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
  • सिंह- या राशीच्या व्यक्तींवर सूर्याचा प्रभाव अधिक असल्याने लाल किंवा पांढरा गुलाब त्यांना दिल्यास ते प्रभावित होऊ शकतात.
  • कन्या- या राशीच्या व्यक्तींना पोपटी किंवा गुलाबी रंगाचे गुलाबाचे फूल देणं योग्य ठरेल.
  • तुळ- या राशीच्या व्यक्तींनाही गुलाबी रंगाचा गुलाब प्रभावित करू शकतो.
  • वृश्चिक- मंगळचा प्रभाव या राशीच्या व्यक्तींवर असल्याने त्यांना लाल किंवा पांढरा गुलाब द्यावा.
  • धनु- या राशीच्या व्यक्तींना पिवळा रंगाचा गुलाब आकर्षित करू शकतो.
  • मकर- निळ्या रंगाचा गुलाब मकर राशीच्या व्यक्तींना दिल्यास ते प्रभावित होऊ शकतात.
  • कुंभ- या राशीच्या व्यक्तींवर शनीचा प्रभाव जास्त असल्याने त्यांना निळा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
  • मीन- या राशीच्या व्यक्तींना पिवळा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Valentines week 2020 impress your love with these horoscope tips rose color significance nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.