Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. final cremation of bull in pune sgy

मुक्या प्राण्यावरचं अनोखं प्रेम…बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी, समाधी उभारत व्यक्त केली कृतज्ञता

कबीऱ्या हा घाटातील राजा म्हणून संबोधला जायचा

February 10, 2020 18:12 IST
Follow Us
    • खरं तर पुणे जिल्ह्याच्या मावळ परिसरात बैलगाडा शर्यत ही जीव की प्राण आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद आहे. अशा परिस्थितीतही बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमध्ये बैलाच्या मृत्यूनंतर मालकाने दशक्रिया विधी करत समाधी उभा करत कृतज्ञता व्यक्त केली. (सर्व फोटो – कृष्णा पांचाळ)
    • पुण्यातील मावळ येथील धामणे गावातील ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाघोजी गराडे यांनी आपला बैल कबीऱ्याचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता.
    • नुकतंच ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं.
    • ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाघोजी गराडे यांनी चाकणच्या बाजारातून कबीऱ्याला (बैल) विकत घेतलं होतं. त्यावेळी तो फक्त सहा महिन्यांचा होता.
    • त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं.
    • अगदी घरातील लहान मुलाला सांभाळतात तसा त्याचा सांभाळ केला. कबीऱ्याला देखील घरातील व्यक्तींचा लळा लागला होता.
    • अगदी एखादी बैलगाडा शर्यत असली की, कबीऱ्या हमखास पहिला येणार यात काही शंकाच नव्हती.
    • मालक ज्ञानेश्वर यांना कबीऱ्याने अनेक शर्यती जिंकून दिल्या.
    • मावळ केसरी, मुळशी केसरी, हिंदकेसरी अशा अनेक बैलगाडा शर्यती त्याने जिंकून दिल्या होत्या.
    • कबीऱ्या हा घाटातील राजा म्हणून संबोधला जायचा
    • आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
    • कबीऱ्या हा घाटातील राजा म्हणून संबोधला जायचा
    • कबीऱ्यामुळे ज्ञानेश्वर यांना चार तालुक्यातील सगळे लोक ओळखू लागले होते.
    • गेल्या सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद असल्याने तो गोठ्यात बसून होता.
    • असं असतानाही मालक ज्ञानेश्वर यांनी त्याला काही कमी पडू दिले नाही.
    • मात्र, शर्यत बंद झाल्याने त्याचा स्थूलपणा वाढला होता. त्यामुळे १ फेब्रुवारीला त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
    • जेव्हा, ज्ञानेश्वर गराडे त्याला पाहण्यासाठी सकाळी गेले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.
    • बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दशक्रिया विधी केला.
    • 1/30

      इतकंच नाही तर त्याची समाधी उभारून मुंडन करत विधीवत पूजा केली. 

    • 2/30

    • 3/30

    • भावपूर्ण निरोप देताना गराडे कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते.
    • 4/30

    • 5/30

      यानंतर त्यांनी घरातील एका सदस्याप्रमाणे कबीऱ्याचा दशक्रिया विधी केला. तसंच घराजवळच समाधी उभारली आहे.

    • 6/30

    • 7/30

    • 8/30

      या दशक्रिया विधीला अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते.

    • 9/30

    • यावेळी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित करत लवकरात लवकर शर्यती सुरू कराव्यात अशी भावना व्यक्त करण्यात आली.
    • 10/30

Web Title: Final cremation of bull in pune sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.