• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. aloe vera nine amazing uses for aloe vera nck

जाणून घ्या, काय आहेत कोरफडीचे आरोग्यदायी फायदे

कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही

February 26, 2020 11:14 IST
Follow Us
    • कोरफडला कुमारी असेही म्हणतात, म्हणजेच कायम तरुण असणारी अशी ही वनस्पती माणसालासुद्धा तरुण ठेवण्यास मदत करते. ऑक्सिडायझेशन कमी करण्यासाठी कोरफडीचा फार उपयोग होतो. कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही. दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी अगदी कुंडीतसुद्धा आपण याची लागवड करू शकतो. जाणून घेऊयात कोरफडीचे फायदे..
    • कोरफडीच्या पानांमधील गर ताजा किंवा सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. सध्या जे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा गर हळद व सैंधव मिसळून घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो.
    • कोरफडीच्या पाच मिलिलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा. त्यामुळे भूक लागते. शौचास साफ होते.
    • कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो.
    • नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.
    • मुलांचे पोट उडते. त्यावर कोरफडीच्या रसात तूप व मध घालून वारंवार चाटवावे. दम कमी होतो. पोट उडणे थांबते.
    • रोज बारीक ताप, भूक न लागणे, वजन कमी होत जाणे, थकवा वाढत जाणे यावर मध आणि पिंपळी चूर्णातून कोरफड रसाचा खूपच चांगला उपयोग होतो.
    • कोरफडाच्या गरापासून बनविलेला ‘काळा वोळ’ हा स्त्रियांच्या पाळीच्या विकारांत अत्यंत गुणकारी आहे.
    • डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.
    • यकृत-प्लीहा वाढणे (लिव्हर व स्पलीन) तसेच जलोदर यांसारख्या जुनाट व भयंकर व्याधीतही कोरफड अत्यंत उपयोगी आहे.

Web Title: Aloe vera nine amazing uses for aloe vera nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.