-
वर्ष 2020 मध्ये अनेक कंपन्या नवनवीन कार लाँच करणार आहेत. अशातच Hyundai कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही Creta साठीही प्री-बुकिंगला सुरूवात झाली आहे. तसेच, कारची संभाव्य किंमत आणि मायलेजबाबतचे डिटेल्स 'लीक' झाले आहेत. (छाया – सौजन्य -@GoMechanic_Blo)
-
भारतात ही एसयूव्ही अधिकृतपणे १७ मार्च रोजी लाँच होणार आहे. कंपनीकडून लाँचिंगच्या तारखेबाबत घोषणा करण्यात आली.
पण, लाँचिंगआधीच या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. २५ हजार रुपयांमध्ये कंपनीच्या देशबरातील सर्व डिलरशीपमध्ये कारसाठी बुकिंग करता येईल. -
बुकिंग रद्द केल्यास २१ हजार रुपये परत मिळतील, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नव्या इंजिनमुळे कारची इंधन कार्यक्षमता वाढणार आहे, त्यामुळे ही SUV आधीपेक्षा अधिक मायलेज देईल असं सांगितलं जात आहे.
-
नवीन क्रेटा भारतीय बाजारात Kia Seltos ला टक्कर देण्याची शक्यता आहे. भारतात गेल्या वर्षापासून सेल्टॉसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे क्रेटाद्वारे सेल्टॉसला मागे टाकण्याचा Hyundai चा प्रयत्न आहे. (छाया सौजन्य – @GoMechanic_Blog)
-
दरम्यान, लाँचिंगआधीच 'क्रेटा'च्या व्हेरिअंट आणि मायलेजबाबत डिटेल्स 'लीक' झालेत. जाणून घेऊया डिटेल्स –
-
नव्या इंजिनमुळे इंधन कार्यक्षमता वाढणार आहे, त्यामुळे ही SUV आधीपेक्षा अधिक मायलेज देईल असं सांगितलं जात आहे.
-
या एसयूव्हीच्या सेकंड जनरेशन मॉडेलला E, EX, S, SX आणि SX(O) अशा चार व्हेरिअंट्समध्ये भारतीय बाजारात उतरवले जाईल.
-
ही एसयूव्ही इंजिनच्या तीन पर्यायांसह 10 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
स्टँडर्ड फीचर्स – प्रोजेक्टर हेडलँप्स, ब्लॅक रेडिएटर ग्रिल, ड्युअल-टोन बंपर, सिल्व्हर B-C पिलर गार्निश, 3.5 इंच मोनो टीएफटी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, D-कट स्टिअरिंग विथ टिल्ट अॅड्जस्टमेंट, हाइट अॅड्जस्टेबल ड्रायव्हर सीट, रिमोट लॉकिंग, रिअर एसी व्हेंट्स यांसारखे स्टँडर्ड फीचर्स नव्या क्रेटामध्ये देण्यात आलेत. -
याशिवाय, पावर अॅड्जस्टेबल ORVMs, लेन चेंज इंडिकेटर, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS विथ EBD, सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर पार्किंग सेंसर्स, स्पीड सेंसिंग डुअर लॉक्स आणि हाय स्पीड अलर्ट यांसारखे स्टँडर्ड फीचर्स आहेत.
-
तसेच, 17 इंच डायमंड कट अॅलॉय व्हिल्स , 8-स्पीकर बोस साउंड सिस्टिम, 7 इंच इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, ऑटो होल्ड फंक्शन असलेले इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि 6 एअरबॅग्स यांसारखे फीचर्स टॉप अँड SX(O) मॉडेलमध्ये मिळतील.
-
नवीन क्रेटामध्ये 1.5L पेट्रोल, 1.5L डिझेल आणि 1.4L टर्बो पेट्रोल इंजिन्स 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.
क्रेटाच्या 1.5L पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंट्समध्ये 16.8kmpl चा मायलेज मिळेल. दुसरीकडे Kia Seltos 1.5L पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंट्ससह 16.5kmpl मायलेज मिळतो. -
2020 Hyundai Creta या SUVची एक्स-शोरुम किंमत १० ते १६ लाख रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे.
लाँचिंगआधीच बुकिंगला सुरूवात, ‘सेल्टॉस’ला Hyundai च्या ‘एसयूव्ही’ची टक्कर
दमदार फीचर्स अन् आकर्षक मायलेजसह Kia Seltos ला देणार टक्कर
Web Title: 2020 hyundai creta bookings open officially in india variant wise engine options also revealed know expected price specifications and all other details sas