• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. microscopic pictures of deadly coronavirus are out see here bmh

कसे दिसतात कोरोना विषाणू? फोटो झाले प्रसिद्ध

राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने कोरोना विषाणूचं छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत.

March 3, 2020 11:42 IST
Follow Us
  • m
    1/10

    m

  • 2/10

    जागतिक स्तरावर आरोग्य आणीबाणी लागू कराव्या लागलेल्या कोरोना विषाणूचे फोटो आता प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अमेरिकेतील मोंटाना येथे असलेल्या राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने (The National Insitute of Allergy and Infectious Diseased -NIAID) वेगवेगळ्या अवस्थेतील विषाणूचे फोटो जारी केले आहेत. राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने प्रसिद्ध केलेलं कोरोना विषाणूचं छायाचित्र. हे छायाचित्र मायक्रोस्कोपच्या मदतीनं घेण्यात आली आहेत.

  • 3/10

    चीनमध्ये हा विषाणू प्रथम संसर्गास कारण ठरला. गेल्यावर्षी डिसेंबरपासूनच या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये सुरू झाला, त्यानंतर आतापर्यंत तो सत्तर देशात पसरला असून चीनमधील ८० हजार लोकांसह जगातील एकूण ८८ हजार लोकांना त्याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 4/10

    जगभरातील सत्तर देशांत प्रसार झालेल्या या विषाणूमुळे गेलेल्या बळींची संख्या आता तीन हजारांवर गेली असून ८८ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने प्रसिद्ध केलेलं कोरोना विषाणूचं छायाचित्र.

  • 5/10

  • 6/10

    चीनने वुहानसह इतर सतरा शहरातील लोकांना ते होते तेथेच जवळपास बंदिस्त केले होते. त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली नव्हती. संसर्ग असलेल्या सर्व लोकोंना वेगळे ठेवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे हा विषाणू पसरण्यास काही प्रमाणात अटकाव झाला. राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने प्रसिद्ध केलेलं कोरोना विषाणूचं छायाचित्र.

  • 7/10

    रविवारी (१ मार्च) एकूण ४२ जण मरण पावले असून ते सर्वच हुबेई व त्याची राजधानी वुहानमधील आहेत. एकूण २,९१२ जणांचा मृत्यू झाला असून ३२६५२ जणांवर उपचार सुरू आहेत. ४४४६२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अजून ७१५ संशयित रुग्ण असून नवीन निश्चित रुग्णांची संख्या हुबेई व वुहानमध्ये १९५ आहे.

  • 8/10

    कोरोनाचा संसर्ग होऊन इराणमध्ये पन्नासहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर इटलीत ३४, दक्षिण कोरियात २२, ऑस्ट्रेलियात १, अमेरिकेत २ लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने प्रसिद्ध केलेलं कोरोना विषाणूचं छायाचित्र.

  • 9/10

    संग्रहित छायाचित्र

  • 10/10

    भारतात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढताना दिसतो आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दिल्ली आणि हैदराबाद येथे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ज्या देशांमध्ये COVID-19 (कोरोना व्हायरस) या व्हायरसचा परिणाम झाला आहे, तिथून हे रुग्ण प्रवास करुन भारतात पोहोचले आहेत. राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने प्रसिद्ध केलेलं कोरोना विषाणूचं छायाचित्र.

Web Title: Microscopic pictures of deadly coronavirus are out see here bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.