-
वाढते वजन हे आजारपणालाच निमंत्रण नसते, तर त्यामुळे मनात न्यूनगंडाची भावना सुद्धा निर्माण होते. जेन अॅटकिन्स या तरुण महिलेची लठ्ठपणावर मात करण्याची गोष्ट इतरांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. ( सर्व फोटो – जेन अॅटकिन्स इन्स्टाग्राम)
-
अति लठ्ठपणामुळे जेन अॅटकिन्सला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सोडून दिले होते.
-
पण यामुळे जेन अजिबात निराश झाली नाही. तिने वजन कमी करण्याची जिद्द बाळगली व स्वत:मध्ये बदल करुन दाखवला.
-
वजन कमी करण्यासाठी जेनने स्वत:वर मेहनत घेण्यास सुरुवात केली.
-
दोन वर्षात जेनने १२३ किलो वरुन वजन ६५ किलोपर्यंत घटवले.
-
एकेकाळी तिला लठ्ठपणावरुन टोमणे मारले जायचे. पण त्याच जेनने मिस ग्रेट ब्रिटनचा २०२० चा किताब पटकावून सर्वांचीच तोंडे बंद केली.
-
जेन अॅटकिन्स तिच्या पूर्व प्रियकराला पहिल्यांदा २०११ साली भेटली त्यावेळी तिचे वजन १०१ किलो होते.
-
२०१५ साली तिचे वजन ११९ किलो होते. त्यावेळी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला.
-
जेव्हा प्रियकराने नाते तोडले, त्यावेळी मी प्रचंड दु:खी झाले होते पण त्यानंतर माझ्या आयुष्यात चांगलेच घडले असे जेनने सांगितले.
-
मागच्यावर्षी जेनचे ख्रिस नावाच्या तरुणाबरोबर लग्न झाले. दोघांचा आता सुखाने संसार सुरु आहे.
-
जेन अॅटकिन्सने मिस ग्रेट ब्रिटनचाच किताब मिळवलेला नाही तर, व्यक्तीमत्व पुरस्कारही तिने जिंकला आहे.
-
फिटनेस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. फिटनेसने माझे आयुष्य बदलले. वजन कमी झाल्यामुळे आता मी जास्त एकाग्रतेने लक्ष केंद्रीत करु शकते. आजाराचे धोके सुद्धा कमी झालेत असे जेनने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते.
-
फिटनेस राखण्यासाठी जेन आठवडयातून पाच वेळा जीमला जाते.
-
कमी वजनामुळे झोप लागली लागते तसेच माणूसही उत्साही राहतो.
-
जास्त वजन समोरच्यासाठी हसण्याचाच विषय नसतो पण त्यातून मनामध्ये एक न्यूनगंड सुद्धा तयार होतो.
PHOTOS: लठ्ठपणामुळे खचून जाऊ नका; पाहा या महिलेची जिद्द
Web Title: This woman lost 55 kg after fiance dumped her for being too fat jen atkins dmp