Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. just like holi heres how some other countries celebrate similar festivals aau

Photos : इतर देशांमध्येही साजरे केले जातात होळीसारखे उत्सव

भारतातील होळीसारखे रंगांचे उत्सव जगभरातही साजरे केले जातात.

March 9, 2020 18:55 IST
Follow Us
  • उत्तर भारतात होळीच्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या रंगांप्रमाणे इतर देशांमध्ये देखील असे उत्सव साजरे केले जातात. भारतात सुक्या आणि ओल्या रंगांचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, इतर देशांमध्ये अतरंगी आणि भन्नाट पद्धतीने हे सण साजरे केले जातात. (Source: File Image)
    1/7

    उत्तर भारतात होळीच्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या रंगांप्रमाणे इतर देशांमध्ये देखील असे उत्सव साजरे केले जातात. भारतात सुक्या आणि ओल्या रंगांचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, इतर देशांमध्ये अतरंगी आणि भन्नाट पद्धतीने हे सण साजरे केले जातात. (Source: File Image)

  • 2/7

    ला टोमॅन्टिना फेस्टिवल (टोमॅटो फेस्टिवल) : स्पेन या देशात हा सण अत्यंत लोकप्रिय आहे. ऑगस्ट महिन्यांत हा साजरा केला जातो. यामध्ये मोठ्या ट्रकमध्ये भरुन आणलेले टोमॅटो ठराविक जागी टाकले जातात. त्यानंतर यातील स्पर्धक हे टोमॅटो एकमेकांच्या अंगावर फेकून मारतात, अंगावर फोडतात तसेच या टॉमॅटोंच्या रगड्यात अक्षरशः लोळतात. हा खेळ संपल्यानंतर तुम्ही नखशिखांत टोमॅटोच्या लाल रंगात रंगूने गेलेले असता. स्पेनमध्ये हा उत्सव प्रचंड लोकप्रिय आहे. तो अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे हजेरी लावतात. जिंदगी ना मिलेगी दोबारा या हिंदी चित्रपटातही हा खेळ दाखवण्यात आला आहे. (Source: File Image)

  • 3/7

    सोंगक्रन फेस्टिवल : भारताप्रमाणे थायलंड या देशात पाणी खेळून हा सण साजरा केला जातो. सोंगक्रन हा इथला पारंपारिक सण असून गेल्या काही वर्षांत त्याची लोकप्रियता वाढली आहे. एप्रिल महिन्यात हा सण साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी लोक घरातून पाण्याच्या पिचकाऱ्या घेऊन बाहेर पडतात आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचा आनंद लुटतात. काही लोक बर्फाच्या बादल्याच घेऊन येतात आणि अचानक लोकांच्या अंगावर खाली करतात. इथल्या लोकांची मान्यता आहे की, एकदा भगवान बुद्धांच्या पुतळ्यांना पाण्याने स्वच्छ करण्यासाठी इथे आणले गेले होते, हे पाणी लोकांच्या अंगावर आशीर्वादरुपी शिंपडण्यात आले होते. तेव्हापासून हा सण इथे साजरा केला जातो. (Source : File Image)

  • 4/7

    मड फेस्टिवल : दक्षिण कोरियामधील हा एक लोकप्रिय उत्सव आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड अर्थात चिखल खेळला जातो. अगदी त्याचप्रमाणे दक्षिण कोरियात हा मड फेस्टिवल खेळला जातो. साऊथ कोरियातील बोरियोंग शहर यासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात हा सण इथे साजरा केला जातो. यामध्ये स्थानिक लोक आणि पर्यटक इथल्या समुद्र किनाऱ्यावर गोळा होतात आणि एकमेकांवर रेतीचे गोळे मारतात, सर्वांगावर मातीचा लेप लाऊन मातीचे स्नान करतात. अस सांगण्यात येतं की, बोरयोंगच्या समुद्र किनाऱ्यावरील रेती ही खनिजसमृद्ध आहे. या रेतीचा वापर सौंदर्यप्रसाधनं बनवण्यासाठी देखील केला जातो. (Source: File Image)

  • 5/7

    वॉटरमेलन फेस्टिवल : ऑस्ट्रेलियात हा सण साजरा केला जातो. इथल्या क्वीन्सलँड प्रांतातील चिंचिला या शहरात हा उत्सव साजरा केला जातो. हे शहर ऑस्ट्रेलियातील कलिंगडांच्या लागवडींची राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कलिंगडांबरोबरच इथं काही मजेशीर खेळ खेळले जातात. यामध्ये कलिगंड खाण्याची स्पर्धा, मेलन स्किइंग, मेलन हेड स्मॅश यांसारख्या खेळांचा समावेश होतो. (source: File Image)

  • 6/7

    ऑरेंज बॅटल (संत्रा युद्ध) : इटली या देशात हा उत्सव प्रसिद्ध आहे. स्पेनमध्ये ज्या प्रमाणे टोमॅटो फेस्टिवल साजरा केला जातो तसाच काहीसा हा उत्सव आहे. यामध्ये लोक एकमेकांवर संत्रे फेकून मारतात. हा इटलीतील सर्वात मोठा फुड फाईट गेम म्हणूनही ओळखला जातो. इटलीत १२ व्या शतकापासून फेब्रुवारी महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो. (Source : File Image)

  • 7/7

    ऑक्टोबरफेस्ट: जर्मनी या देशात हा उत्सव साजरा केला जातो. ज्या प्रमाणे आपण भारतीय लोक उन्हापासून संरक्षणासाठी थंड पेये घेतो त्याचप्रमाणे जर्मन लोक असाच उत्सव साजरा करतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बिअर पिऊन हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी विविध देशांतील लोक हा उत्सव साजरा करण्यासाठी इथे हजेरी लावतात. यासाठी बिअर निर्मात्या कंपन्या विविध चवीच्या बिअर या उत्सवासाठी तयार करतात. त्यामुळे इथल्या स्थानिक बाजारपेठेलाही याचा फायदा होतो. (Source: File Image)

TOPICS
होळी २०२५Holi 2025

Web Title: Just like holi heres how some other countries celebrate similar festivals aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.