• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. passengers arrived at pune on a dubai pune spicejet bmh

पुण्यात परदेशातून आले 129 प्रवासी

118 भारतीय असून, 11 परदेशी नागरिक

March 13, 2020 17:23 IST
Follow Us
  • पुणे सध्या चर्चेचं केंद्रबिंदू आहे. त्याला कारणही तसंच आहे. चीनच्या वुहान शहरात जगाला हादरवणाऱ्या करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर हळूहळू तो जगभरात पसरला. गेल्या आठवड्यात तो महाराष्ट्रात शिरला. त्यानंतर पुण्याची चर्चा सुरू झाली. (Indian Express photo by Arul Horizon)
    1/10

    पुणे सध्या चर्चेचं केंद्रबिंदू आहे. त्याला कारणही तसंच आहे. चीनच्या वुहान शहरात जगाला हादरवणाऱ्या करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर हळूहळू तो जगभरात पसरला. गेल्या आठवड्यात तो महाराष्ट्रात शिरला. त्यानंतर पुण्याची चर्चा सुरू झाली. (Indian Express photo by Arul Horizon)

  • 2/10

    महाराष्ट्रात पहिला करोनाग्रस्त रुग्ण पुण्यात आढळून आला. दुबईला फिरायला गेलेल्यांपैकी एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले.

  • 3/10

    पुण्यातील करोनाग्रस्त दाम्पत्याच्या संपर्कात आल्यामुळे आणखी तिघांना संसर्ग झाला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 16 असून संशयितांवर आरोग्य विभागाकडून नजर ठेवली जात आहे.

  • 4/10

    परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे करोनानं महाराष्ट्रात प्रवेश केला. सध्या अनेक भारतीय परदेशात असून, दुबईतून आणखी 129 नागरिक शुक्रवारी पहाटे दाखल झाले.

  • 5/10

    'स्पाईसजेट'च्या विमानानं या नागरिकांना आणण्यात आलं. पुणे विमानतळावर हे नागरिक उतरले.

  • 6/10

    सकाळी चार वाजता पुण्यात पोहोचलेल्या या विमानामध्ये 74 पुरुष, 41 स्त्रिया, 10 लहान मुलं, 4 बालक आहेत. हे एकून 129 प्रवासी आहेत. 

  • 7/10

    यात 118 नागरिक भारतीय असून, 11 परदेशी आहेत. विमानतळावर या नागरिकांना वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आलं.

  • 8/10

    या तपासणीमध्ये एकाही प्रवाशाला करोनाचा संसर्ग झाला नसल्याचं निष्पन्न झालं आहे. दोन भारतीय नागरिकांपैकी एका 26 वर्षीय महिला आणि एक वर्षाचं बाळ आजारी आहे. त्यांना कफ असल्याचं सांगण्यात आलं असून, नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • 9/10

    संग्रहित छायाचित्र

  • 10/10

    करोना पसरत असल्यानं सरकारच्या वतीनं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांकडून याला प्रतिसाद मिळत असून, मुलांना शाळेत पाठवतानाही पालक काळजी घेत आहेत.

Web Title: Passengers arrived at pune on a dubai pune spicejet bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.