-
मुंबईतून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील मूळगावी निघालेल्या हजारो लोकांना नाशिकजवळच्या वालधुनी येथे पोलिसांनी थांबवलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्रशांत नाडकर )
-
यांपैकी काही लोक हे तीन मोठ्या कंटेनरमधून लपून प्रवास करीत होते. तर तर जवळपास ५०० लोक पायी प्रवास करीत होते.
-
कंटेनरमधून लपवून परप्रांतीयांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी महामार्गावर अडवला.
-
कंटेनर अडवल्यानंतर यातून प्रवास करणाऱ्या लोकांकडे चौकशी करताना पोलीस कर्मचारी.
-
कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांची माहिती यावेळी पोलिसांनी नोंदवून घेतली.
-
आपल्याकडील आहे त्या सामानासह आपापल्या राज्यांमध्ये निघालेले तरुण.
-
कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय प्रवास करीत होते.
-
पायी प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना पुढे जाण्यापासून रोखल्याने अनेकांनी आहे त्या ठिकाणीच ठिय्या मांडला.
-
महाराष्ट्राची सीमा ओलांडण्यापासून अडवल्यानंतर पोलिसांनी त्यांना बिस्किटांच्या पाकिटांचे वाटप केले.
-
आता पुढे काय या प्रतिक्षेत नजर लावून बसलेले स्थलांतरित नागरिक.
परप्रांतियांना घेऊन जाणारे कंटेनर पोलिसांनी रोखले
Web Title: Thousands of people who were heading towards up and mp were stopped by police at valdhuni near nashik asy