• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. construction workers from mumbai traveling to their village in karnataka by walking due to lock down psd

कष्टकऱ्यांच्या नशिबातला संघर्ष कायम

मुंबई ते कर्नाटक हा प्रवास हे मजुर चालत करत आहेत

March 31, 2020 20:25 IST
Follow Us
  • करोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. याचा सर्वात जास्त फटका देशातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसलेला आहे. (सर्व छायाचित्र - अरुल हॉरिझन)
    1/15

    करोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. याचा सर्वात जास्त फटका देशातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसलेला आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझन)

  • 2/15

    सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद…रोजगार तुटलेला त्यातच सर्व राज्यांच्या सीमा बंद…अशा परिस्थितीत या कामगारांची अधिक कुचंबणा होतेय.

  • 3/15

    पण आपल्या गावची ओढ काही केल्या कमी होत नाही…त्यामुळे अखेरीस या नागरिकांनी पायी चालत आपलं गाव गाठायचं ठरवलं. कर्नाटकातील गुलबर्गा इथले हे मजुर मुंबईतील बोरिवली भागात एका इमारतीवर कामाला होते.

  • 4/15

    मुंबई ते कर्नाटक हा जवळपास ३९० किलोमिटरचा हा प्रवास हे मजुर चालत करणार आहेत, वाटेत अडथळे अनेक येतील पण घराची ओढ काही केल्या यांना थांबू देत नाही.

  • 5/15

    चालून चालून पाय दुखायला लागले की रस्त्याच्या शेजारी थोडा वेळ थांबायचं…काळवंडलेले पाय आणि भेगा त्यांचा संघर्ष सांगत आहेत.

  • 6/15

    कितीही त्रास होत असला तरीही ते दु:ख चेहऱ्यावर आणू न देता प्रवास करत रहायचा हेच या मजुरांनी ठरवलं आहे.

  • 7/15

  • 8/15

    पुण्यात हडपसरजवळ विसाव्यासाठी हे मजुर काहीकाळ थांबले होते.

  • 9/15

    सोबतीला भाकऱ्या-चटणी आणि टोमॅटो असा बेत यांनी आणलेला आहे.

  • 10/15

    जिथे सावली मिळेल तिकडे दोन घास पोटात ढकलायचे आणि पुढच्या प्रवासासाठी अंगात बळ आणायचं ही खुणगाठ प्रत्येकाने मनाशी पक्की केली आहे.

  • 11/15

    जेवणं झालं की थोडावेळ आहे तिकडेच आराम करायचा…काही जणं इथेच छोटीशी डुलकी काढतात.

  • 12/15

    गावात आपल्या नातेवाईकांना आपली ख्याली-खुशाली कळवायची हीच ती वेळ असते.

  • 13/15

    आपल्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व मजुरांना वाऱ्यावर सोडू नका अशी सूचना सरकार वारंवार करत आहे, मात्र प्रत्यक्ष असं काहीच घडताना दिसत नाही.

  • 14/15

    करोना असो किंवा आणखी काही कष्टकऱ्यांच्या नशिबी असणारा संघर्ष कायम आहे.

  • 15/15

    अशा खडतर प्रसंगामध्ये अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदत करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Construction workers from mumbai traveling to their village in karnataka by walking due to lock down psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.