• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pune market yard police constable harshala khade doing food distribution job in lockdown area psd

कॉन्स्टेबल खाडे, ऑनड्युटी २४ तास !

बंदोबस्तासह गरजू व्यक्तींना करत आहेत जेवण वाटप

April 12, 2020 16:44 IST
Follow Us
  • संपूर्ण राज्याला करोना विषाणूचा विळखा बसलेला आहे. पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असून अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
    1/9

    संपूर्ण राज्याला करोना विषाणूचा विळखा बसलेला आहे. पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असून अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 2/9

    मात्र पुण्याच्या मार्केट यार्ड पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणाऱ्या हर्षला खाडे या सध्या दुहेरी भूमिका बजावत आहेत. लॉकडाउनमध्ये बंदोबस्ताच्या ड्युटीसोबतच हर्षला परिसरातील गरीब व गरजू व्यक्तींना NGO तर्फे जेवण वाटत आहेत.

  • 3/9

    हर्षला खाडे यांचा परिवारच करोनाविरोधातील लढाईत रस्त्यावर उतरला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हर्षला यांची एक बहिण पोलिस खात्यात असून इतर दोन बहिणी नर्स म्हणून काम करत आहेत. ही सर्व भावंड सध्या करोनाशी लढण्यासाठी रस्त्यावर उतरली आहेत.

  • 4/9

    हर्षला यांचे पती भारतीय सैन्यात कार्यरत असून, करोनामुळे परिस्थिती गंभीर झाल्यानंतर हर्षला यांनी आपल्या मुलांना साताऱ्यात माहेरी पाठवण्याचा निर्णय घेतला. आपली मुलं आपल्यापासून दूर असली तरीही इतर लहानग्यांना जेवण देताना आपल्याला समाधान मिळत असल्याचं खाडे म्हणाल्या.

  • 5/9

    ड्युटीवर असताना आपल्यालाही करोनाची लागण होऊ शकते याची हर्षला यांना पूर्णपणे जाणीव आहे, याचसाठी जेवण वाटप करायला जात असताना त्या काळजी घेतात.

  • 6/9

    गेल्या काही दिवसांपासून हर्षला जवळच्या परिसरात दररोज १०० जेवणाची पाकीटं वाटप करत आहेत.

  • 7/9

    हा परिसर मला माहिती आहे, आणि इथला प्रत्येक व्यक्ती सध्या भुकेला आहे, त्यामुळे मी स्वतः यांच्यापर्यंत जेवणाची पाकीट पोहचवण्याची जबाबदारी घेतल्याचं खाडे यांनी सांगितलं.

  • 8/9

    हर्षला खाडे यांच्यासारखे कर्मचारी आजही पोलिस खात्याची शान वाढवत आहेत.

  • 9/9

    दरम्यान पुण्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकार उपाय करत आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Pune market yard police constable harshala khade doing food distribution job in lockdown area psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.