• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. sania mirza and shoaib malik wedding complete ten years dmp

PHOTOS: ट्रोलिंगला पुरुन उरलेल्या सानिया-शोएबच्या लग्नाची १० वर्ष, जाणून घ्या काही खास गोष्टी

April 13, 2020 18:03 IST
Follow Us
  • सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या जोडप्याच्या लग्नाला काल १२ एप्रिल रोजी दहावर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पती शोएबसोत एक फोटो पोस्ट केला आहे. (सर्व फोटो सौजन्य - सानिया मिर्झा/शोएब मलिक इन्स्टाग्राम)
    1/15

    सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या जोडप्याच्या लग्नाला काल १२ एप्रिल रोजी दहावर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पती शोएबसोत एक फोटो पोस्ट केला आहे. (सर्व फोटो सौजन्य – सानिया मिर्झा/शोएब मलिक इन्स्टाग्राम)

  • 2/15

    सानिया मिर्झा भारताची प्रसिद्ध टेनिसपटू तर शोएब मलिक पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. १२ एप्रिल २०१० रोजी दोघे आयुष्यभरासाठी विवाहबंधनात अडकले.

  • 3/15

    हैदराबादच्या ताज कृष्णा या आलिशान हॉटेलमध्ये इस्लामिक पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला.

  • 4/15

    शोएब मलिकने २३ एप्रिल २०१८ रोजी सानिया आई होणार असल्याचे जाहीर केले.

  • 5/15

    सानिया मिर्झाने ३० ऑक्टोंबर २०१८ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. 'इझहान' असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

  • 6/15

    सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे क्रीडा क्षेत्रातील मोठे सेलिब्रिटी कपल आहे. दोघांनी आपआपल्या क्षेत्रात यशस्वी कामगिरी करुन दाखवली आहे.

  • 7/15

    शोएब मलिकने सानिया मिर्झासोबतचा दुबईमधला शेअर केलेला फोटो.

  • 8/15

    सानिया मिर्झा भारतीय तर शोएब मलिक पाकिस्तानी आहे. दोघांनी जेव्हा लग्नाचा निर्णय जाहीर केला, तेव्हा दोन्ही देशातून त्यांच्या निर्णयावर मोठया प्रमाणावर टीका झाली होती.

  • 9/15

    मी चित्रपट बनवला तर फराह खान त्यामध्ये हिरो असेल असे शोएब मलिकने कॅप्शन दिले आहे.

  • 10/15

    टेनिसमध्ये महिला दुहेरीच्या प्रकारात सानिया मिर्झा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. करीयरमध्ये तिने सहा ग्रँण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

  • 11/15

    सानिया मिर्झामुळे महिला टेनिसमध्ये भारताला एक वेगळी ओळख मिळाली.

  • 12/15

    १५ नोव्हेंबर १९८६ रोजी मुंबईमध्ये सानिया मिर्झाचा जन्म झाला. हैदराबादमध्ये तिने टेनिसचे धडे गिरवले

  • 13/15

    सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने कारमध्ये काढलेला सेल्फी.

  • 14/15

    २००७ ते २००९ दरम्यान शोएब मलिकने पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.

  • 15/15

    कसोटीमधून आधीच निवृत्ती जाहीर करणाऱ्या शोएब मलिकने मागच्यावर्षी वर्ल्डकप नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Web Title: Sania mirza and shoaib malik wedding complete ten years dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.