-
पुणे : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दरवर्षी दिवसभर गर्दीने फुलून गेलेला पुणे स्टेशन परिसर यंदा लॉकडाउनमुळे सूनासूना आहे. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येथे लाखो भिमानुयायी एकत्र येत असतात.
-
गेल्या २१ दिवसांपासून देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात सर्वच कार्यक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.
-
भीम जयंती घरातच वेगळ्या पद्धतीने आणि डिजिटल स्वरुपात साजरी करावी, असे आवाहन सरकारी आणि आंबेडकरी नेत्यांच्याकडून करण्यात आले होते.
-
या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी लॉकडाउनची बाब गांभीर्यानं घेतली असून त्याचाच चांगला परिणाम आज पहायला मिळाला.
आंबेडकरी जनतेनं पाळला लॉकडाउन, घरातच साजरी झाली भीम जयंती
Web Title: Dr babasaheb ambedkar statue near pune station remain closed on the occasion of his birth anniversary due to ongoing lock down corona virus sdn