-
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता ठिकठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी बुथ उभारण्यात आले आहेत. (सर्व छायाचित्रे – निर्मल हरिंद्रन)
-
वरळी येथील जिजामाता नगरच्या प्रवेशद्वारावरच एक सॅनिटायझिंग बुथ उभारण्यात आले आहे. त्यामुळे इथले नागरिक निर्जंतुकीकरणासाठी या बुथमधून ये-जा करीत आहेत.
-
त्याचबरोबर पालिकेचे आरोग्य कर्मचारी देखील आपला दिवसभरातील तपासणी कार्यक्रम संपल्यानंतर या सॅनिटायझिंग बुथमधूनच बाहेर पडत आहेत.
-
सुरुवातीला रस्त्यावर सातत्याने नागरिकांचा सामना करणाऱ्या पोलिसांसाठी अशा प्रकारच्या सॅनिटायझिंग टनेल किंवा बुथची सोय करण्यात आली होती.
-
त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी देखील सोसायट्यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे सॅनिटायझिंग बुथ उभारण्यात आले आहेत.
वरळीच्या जिजामाता नगरमध्ये सॅनिटायझिंग बुथची उभारणी
Web Title: Sanitizing booth installed at the entrance of veer jijamata nagar in worli asy