-
देशात तीन मे पर्यंत लॉकडाउन कायम असला तरी २० एप्रिलपासून काही कामांना अंशतः परवानगी देण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे- प्रशांत नाडकर)
-
रस्त्यावरची रखडलेली कामं तसेच उड्डाणपुलांची कामंही काही प्रमाणात सुरु झाली आहेत.
-
मानखुर्द जवळील देवनार उड्डाणपुलाचे कामही सोमवारपासून सुरु झाले.
-
यासाठी काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या सर्व सुरक्षा उपकरणांसह तोंडाला मास्क बांधत करोनापासून बचावाची काळजी घेतली आहे.
-
यावेळी इथल्या कामगारांनी हात उंचावत आम्ही करोनापासून बचावाची सर्व खबरदारी घेऊ अशी जणू ग्वाहीच दिली.
-
कामापूर्वीचे सर्व सोपस्कर पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर काही उद्योगांना आजपासून परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना करोना संदर्भातील सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे.
-
टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
-
कामाला सुरुवात करण्यापूर्वी ठेकेदारानं सर्व कामगारांची एकत्र बैठक घेतली. तसेच करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सूचना केल्या.
-
तीस दिवसांच्या लॉकडाउननंतर राज्याच्या अर्थिक बाबींचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातून सावरण्यासाठी लॉकडाउनमधून थोडी शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाउनमधून दिलासा; देवनार उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात
Web Title: Mankhurd flyover construction work start near deonar in mumbai during lockdown asy