• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the longing for home and finally the burst of restraint aau

घराची लागली ओढ अन् संयमाचा फुटला बांध

May 11, 2020 17:57 IST
Follow Us
  • शासनाकडून परराज्यात जाण्यासाठी परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षात कृती होत नसल्याने मजुरांचा धीर सुटत चालला आहे. दररोजची आपल्या कुटुंबासह हे मजूर महामार्गावरुन पायी आपल्या गावी निघाले आहेत. (सर्व छायाचित्र - सचिन हळदे)
    1/18

    शासनाकडून परराज्यात जाण्यासाठी परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षात कृती होत नसल्याने मजुरांचा धीर सुटत चालला आहे. दररोजची आपल्या कुटुंबासह हे मजूर महामार्गावरुन पायी आपल्या गावी निघाले आहेत. (सर्व छायाचित्र – सचिन हळदे)

  • 2/18

    पोलिसांनी अडविल्यानंतर अनेक कुटुंबे रस्त्याच्या कडेला झोपत होते.

  • 3/18

    या स्थलांतरितांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शेकडो किमी पायी चालल्यानंतर त्यांना रात्री झोपेसाठी महामार्गावरील डिव्हाडरचा धोकादायक आसरा घ्यावा लागत आहे.

  • 4/18

    यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हे विद्यार्थी अशा प्रकारे जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडत आहेत.

  • 5/18

    एका मोठ्या इमारतीसमोरील मोकळ्या जागेत तरुणांनी काही काळ विसावा घेतला.

  • 6/18

    महामार्गाच्या कडेला धोकादायक पद्धतीने काही जणांनी झोपेसाठी जागा निवडल्या.

  • 7/18

    आपल्याजवळील जड बॅगा खांद्यावर घेऊन, हातात पाण्याच्या बाटल्या आणि तोंडावर मास्क अशा पद्धतीने हे तरुण आपल्या घराकडे मार्गस्थ झाले आहेत.

  • 8/18

    कुटंबच्या कुटुंबच आपल्या छोट्या मुलांसोबत मिळेल त्या वाहनांनी प्रवास करीत आहेत.

  • 9/18

    एरव्ही काहीतरी सामानांनी भरलेला हा मिनीट्रक यंदा माणसांनी भरला आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी थांबलेला असताना टिपलेले छायाचित्र.

  • 10/18

    रात्रीच्यावेळी तरुणांचे जत्थेच्या जत्थे महामार्ग ओलांडताना दिसत आहेत.

  • 11/18

    हातात आणि डोईवर ओझं घेऊन हे स्थलांतरित नागरिक पायी मार्गस्थ झाले आहेत.

  • 12/18

    रात्रीचा दिवस करुन घराकडं निघालेली तरुण मंडळी.

  • 13/18

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका थांब्यावर रात्रीच्यावेळी या स्थलांतरित नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. गावी जाण्यासाठी कुठलं वाहन मिळतय का? याची वाट ते पाहत आहेत.

  • 14/18

    स्थलांतरितांमध्ये तरुण मुलांबरोबरच मुलींचाही सहभाग पहायला मिळतो आहे. मोठं ओझं पोटाशी घेऊन घराकडं निघालेली एक तरुणी.

  • 15/18

    लॉकडाउननं लोकांच्या पायाची चाकं आणि रात्रीचा दिवस करुन टाकला आहे. शेवटी आपल्या घरीच तो खरा विसावा याची ओढ त्यांना लागून राहिली आहे.

  • 16/18

    "मुंबईत राहणं आता शक्य नाही, काम नाही, पैसा नाही मग जगणार तरी कसं?" असा सवाल ते करत आहेत.

  • 17/18

    "आम्ही तसेही उपाशी पोटी मारणार आहोत, त्यापेक्षा इथेच आम्हाला गोळ्या घाला" असं काही मजुरांनी हताशपणे पोलिसांना सांगितलं.

  • 18/18

    रविवारी रात्री देखील मुंबई अहमदाबाद महामार्गावरून शेकडो कुटुंब पायी जात होते.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: The longing for home and finally the burst of restraint aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.