Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus vaccine latest update astrazeneca oxford vaccine dmp

आत्मविश्वास! अंतिम निकालाआधीच एस्ट्राजेनेकाने करोनावरील लसीचं सुरु केलं उत्पादन

June 9, 2020 17:51 IST
Follow Us
  • जगभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ७० लाखाच्या घरात पोहोचली आहे. भारतात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. पुढचे काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत. या व्हायरसला रोखणारे औषध, लस शोधून काढण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. क्लिनिकल ट्रायलच्या स्टेजवर वेगवेगळी औषधे प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी औषधाचे उत्पादनही सुरु झाले आहे. आपण जाणून घेऊया जगभरात कुठे, काय संशोधन सुरु आहे.
    1/10

    जगभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ७० लाखाच्या घरात पोहोचली आहे. भारतात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. पुढचे काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत. या व्हायरसला रोखणारे औषध, लस शोधून काढण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. क्लिनिकल ट्रायलच्या स्टेजवर वेगवेगळी औषधे प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी औषधाचे उत्पादनही सुरु झाले आहे. आपण जाणून घेऊया जगभरात कुठे, काय संशोधन सुरु आहे.

  • 2/10

    ब्रिटनमधील आघाडीची औषध कंपनी एस्ट्राजेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर हातमिळवणी केली आहे. सर्वप्रथम ऑक्सफर्डने करोना व्हायरसवर नमुना लस विकसित केली. ही लस क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या स्टेजमध्ये आहे. चाचण्यांच्या निकषांवर ही लस यशस्वी ठरली तर सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी ही लस उपलब्ध होईल. जवळपास २० लाख लसींचे एस्ट्राजेनेकाने उत्पादन सुरु केले आहे.

  • 3/10

    ब्राझीलने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकाने बनवलेल्या लसीच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत सर्व डाटा उपलब्ध असेल. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत ही लस उपयुक्त आहे की, नाही ते स्पष्ट होईल. ब्राझीलला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे.

  • 4/10

    ब्रिटनमधील आघाडीची औषध कंपनी एस्ट्राजेनेकाने अमेरिका, युनायटेड किंगडम या देशांबरोबर लस निर्मितीचे करार केले आहेत. एस्ट्राजेनेका अमेरिकेसाठी ४० कोटी आणि युनायडेट किंगडमसाठी १० कोटी लसींची निर्मिती करणार आहे. मानवी चाचण्या यशस्वी ठरतायत असे दिसले तर विकसनशील आणि गरीब देशांसाठी सुद्धा लसींची निर्मिती करण्यात येईल.

  • 5/10

    करोना व्हायरसमुळे जपानमध्ये होणारी नियोजित ऑलिंपिक स्पर्धा सुद्धा पुढे ढकलावी लागली आहे. तिथे सुद्धा दिवसरात्र करोना व्हायरसविरोधात लस निर्मितीवर संशोधन सुरु आहे. जपानचा २०२१ सालच्या पहिल्या सहा महिन्यात आपल्या जनतेसाठी लस उपब्ध करण्याचा प्रयत्न आहे. जपानमध्येच बनवण्यात आलेले फॅव्हीपीरावीर हे औषध करोनावर प्रभावी ठरत आहे. जपानने हे औषध दुसऱ्या देशांनाही उपलब्ध करुन दिले आहे.

  • 6/10

    अमेरिकेने आधीपासूनच २० लाख लसींची निर्मिती करुन ठेवली आहे. सर्व चाचण्यांच्या निकषावर ही लस यशस्वी ठरली तर थेट ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे.

  • 7/10

    सिंगापूरमधल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा करोना व्हायरसवर लस विकसित करण्याच्या कार्यक्रमाला गती दिली आहे. पुढच्या महिन्यात सिंगापूरमध्ये करोना विरोधात बनवण्यात आलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेतील मोडर्ना कंपनीच्या धर्तीवर सिंगापूरने ही लस विकसित केली आहे.

  • 8/10

    चीनमध्ये करोना लसीच्या पाच नमुन्यांवर चाचण्या सुरु आहेत. करोना व्हायरस या आजाराची सुरुवातच चीनमधून झाली आहे. त्यामुळे या आजारावर लस शोधण्यासाठी तिथे मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पहिली लस बाजारात कोण आणणार ? ही स्पर्धा अमेरिका आणि चीनमध्ये आहे.

  • 9/10

    चीनमध्ये बनवण्यात येत असलेल्या लसींपैकी पाच लसी क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या फेजमध्ये आहेत. बहुतांश लसींचे चांगले रिझल्टस आले आहेत. सिनोवॅक बायोटेक या लसीची सर्वात जास्त चर्चा आहे.

  • 10/10

    पुणे स्थित सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने लस निर्मितीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर करार केला आहे. सिरम इन्स्टिटय़ूट ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर सप्टेंबर-ऑक्टोंबर पर्यंत ही लस बाजारात उपलब्ध करुन देण्याचा सिरमचा प्रयत्न आहे. त्याशिवाय भारतात बीबीआयएल आयसीएमआरसोबत मिळून लस विकसित करत आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus vaccine latest update astrazeneca oxford vaccine dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.