-
संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र
-
लॉकडाउनच्या नियमांच पालन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
लॉकडाउनदरम्यान १४ ते १८ जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे १९ ते २३ जुलैपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
१३ ते २३ जुलैदरम्यान सर्व उद्यानं आणि क्रीडांगणं बंद राहणार आहेत. याशिवाय सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
पुण्यात दहा दिवस सर्व सलून दुकानं, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद असणार आहेत.
-
१४ ते १८ जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद असतील. १९ ते २३ जुलैदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहील.
-
१४ ते १८ जुलै या पाच दिवसात मटण, चिकन, अंडी यांची विक्री पूर्णपणे बंद असणार आहे. १९ ते २३ जुलैदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मटण, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
लॉकडाउनचे पूर्ण दहा दिवस शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद राहतील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
झोमॅटो, स्विगीसारख्या ऑनलाइन पोर्टलवरुन मागवले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा दहा दिवस बंद असणार आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने- दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्पत: बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसंच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे-येणे करिता व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर अनिवार्य राहील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
शहरातील सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर, इत्यादीसाठी संपूर्णत बंद राहील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
सर्व प्रकराचे बांधकाम, बांधकामाची कामं बंद राहतील. ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह बंद राहतील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसंच लग्न समारंभ, स्वागत समारंभ बंद राहतील. मात्र यापूर्वी परवानगी घेतलेले लग्न समारंभ २० पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित करता येतील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
(संग्रहित छायाचित्र)
-
खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा, रुग्णालये, रुग्णालयाशी निगडीत सेवा सुरु राहतील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
पेट्रोल पंप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अरूल होरायझन)
-
लॉकडाउन कडक पाळला जावा यासाठी रस्त्यावर जवळपास सात हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. संग्रहित (Express Photo By Pavan Khengre)
पुण्यात कडक लॉकडाउनला सुरुवात, काय सुरु…काय बंद ? जाणून घ्या
करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुण्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या अमलबजावणीला सुरुवात झाली आहे
Web Title: Coronavirus lockdown in pune sgy