Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. russia trying to steal coronavirus vaccine data claims us uk canada sgy

रशियानं चोरलं करोना लसीचं संशोधन; अमेरिका आणि इंग्लंडचा गंभीर आरोप

अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाकडून हा आरोप करण्यात आला आहे.

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली असल्याचा दावा केल्यानंतर त्यांच्यावर लसीचं संशोधन चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. संग्रहित (Photo: Reuters)
    1/15

    रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली असल्याचा दावा केल्यानंतर त्यांच्यावर लसीचं संशोधन चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. संग्रहित (Photo: Reuters)

  • 2/15

    अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाकडून हा आरोप करण्यात आला आहे. संग्रहित (Photo: Reuters)

  • 3/15

    अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं असून रशियावर आरोप केला आहे. संग्रहित (Photo: Reuters)

  • 4/15

    जगभरात करोनाचा फैलाव वाढत असून अद्यापही करोनावरील लस उपलब्ध न झाल्याने रशियाच्या या संशोधनामुळे दिलासा व्यक्त केला जात होता. पण आता अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाच्या दाव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

  • 5/15

    ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राने केलेल्या आरोपानुसार, APT29 या हँकिंग ग्रुपने लसीसंबंधी संशोधन कऱणाऱ्या ब्रिटनमधील प्रयोगशाळांवर सायबर हल्ले केले आणि महत्त्वाची माहिती चोरली. APT29 ला Cozy Bear या नावानेही ओळखलं जातं. संग्रहित (Photo: Reuters)

  • 6/15

    रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, APT29 ही रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा भाग असून करोनावरील लसींची माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करत आहे.

  • 7/15

    ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राचे (एनसीएससी) संचालक पॉल चेचेस्टर यांनी म्हटलं आहे की, "करोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी करणाऱ्यांविरूद्ध अशा सायबर हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो”.

  • 8/15

    ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी निवदेनात म्हटलं आहे की, “करोनाशी लढा देण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना रशियन गुप्तचर यंत्रणांनी अशा पद्धतीने टार्गेट करणं अमान्य आहे”.

  • 9/15

    “एकीकडे काहीजण आपल्य स्वार्थी आणि चुकीच्या वर्तनातून आपला स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना इंग्लंड आणि त्यांचे सहकारी देश लस मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत,” असंही ब्रिटनने म्हटलं आहे. संग्रहित (Photo: Reuters)

  • 10/15

    Cozy Bear यांना Dukes म्हणूनही ओळखलं जातं. अमेरिकेने हा रशियन सरकारशी संबंधित दोन हॅकिंग ग्रुपहद्दल असल्याचं याआधी सांगितलं होतं. या हँकिंग ग्रुपने २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये घुसखोरी करत ईमेलची चोरी केली होती. दुसऱ्या ग्रुपचं नाव Fancy Bear आहे.

  • 11/15

    रशियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. रशियाचं याच्याशी काही देणं घेणं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संग्रहित (Photo: Reuters)

  • 12/15

    दरम्यान निवदेनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना संशोधन चोरीची माहिती आहे की नाही याबाबत कोणती माहिती देण्यात आलेली नाही. पण हे संशोधन चोरी करण्यासाठी मोठी रक्कम मोजली असल्याचा ब्रिटीश अधिकाऱ्यांना विश्वास आहे. संग्रहित (Photo: Reuters)

  • 13/15

    गुप्तचर संस्थांचे अधिकारी सातत्याने या चोरीच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत माहिती चोरीला गेली का, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या दाव्यानुसार, आतापर्यंत कोणतीही गुप्त माहिती चोरीला गेलेली नाही. संग्रहित (Photo: AP)

  • 14/15

    अमेरिकेनेही एका महिन्यापूर्वी चीनवर असाच आरोप केला होता. एपबीआयचे संचालक क्रिस यांनी चीन करोनासंबंधी संशोधन करणाऱ्या अमिरेकेच्या आरोग्य संघटना, औषध पुरवठा कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. संग्रहित (Photo: Reuters)

  • 15/15

    रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली असून स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटलं होतं. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. संग्रहित (Photo: AP)

Web Title: Russia trying to steal coronavirus vaccine data claims us uk canada sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.