• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mandar patki beed inspirational success story nck

पहिल्या प्रयत्नात IAS! बीडच्या तरुणाची कामगिरी

You Are cheaking the IAS officer pocket अशी चिठ्ठी त्यांनी आठवीत असताना पाकिटात ठेवली होती.

August 4, 2020 15:31 IST
Follow Us
    • नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. या परीक्षेत बीडमधील मंदार पत्की या तरुणानं उज्ज्वल यश मिळवलं आहे. मंदार पत्की याने देशातून २२ वा क्रमांक पटकावून आयएएस व्हायचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.
    • मंदार सांगतो, "वडील सरकारी नोकरी करत असल्यामुळे सरकारी नोकरीबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला त्याबद्दल आणखी जास्त माहिती मिळाली. त्यामुळे आयएएस व्हायचं स्वप्न आणखी प्रबळ झालं."
    • आठवीत असतानाच मंदार पत्कीने आयएएस व्हायचा घाट धरला होता. You Are cheaking the IAS officer pocket अशी चिठ्ठी त्यांनी आठवीत असताना पाकिटात ठेवली होती.
    • पुण्यातील बीआयटीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलं. शेवटच्या वर्षाला असताना UPSC ची तयारी सुरु केली.
    • विकेंडला तो क्लासला जात असे. वर्षभरानंतर प्रयत्न केल्यानंतर मंदार UPSC परीक्षेत देशातून २२ वा आला आहे.
    • मंदार पत्की याचं दहावीपर्यंतच शिक्षण बीडमधील संस्कार विद्यालयात पूर्ण झालं.
    • घरात सर्वच जण उच्च शिक्षित आहे. आई गृहिणी आहे. तर वडील सध्या निवृत्त आहेत. ते एमएसईसीबीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते.
    • मंदारला दोन मोठ्या बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं एमटेक झालं असून त्या पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. तर दुसरी मोठी बहीण पुण्यात मास्टर ऑफ सर्जरी करत आहे.
    • मंदारच्या या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण असून शुभेच्छा देण्यासाठी घरी लोकांनी गर्दी केली आहे.
    • मंदार पत्की यांनी पहिल्या प्रयत्नात मिळवलेलं यश, अनेक तरुणांना प्रेरणा देणारं आहे.

Web Title: Mandar patki beed inspirational success story nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.