-
मराठमोळे ६५ वर्षीय ज्येष्ठ वकील हरिश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. लंडनमधील आर्टिस्ट कॅरोलिन ब्रॉसार्डसोबत त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. ( फोटो – इंडिया टुडे)
बुधवारी लंडनमधील चर्चमध्ये १५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. यावेळी काही मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. (फोटो – इंडिया टुडे) हरिश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती. दोघांनाही थिएटर, शास्त्रीय संगीत तसंच कलेची आवड आहे. (फोटो – इंडिया टुडे) ३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे वेगळे झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. तर कॅरोलिन ब्रॉसार्ड यांचंही हे दुसरं लग्न असून त्यांना १८ वर्षांची एक मुलगी आहे. (फोटो – इंडिया टुडे) -
हरिश साळवे यांचा १९५५ मध्ये महाराष्ट्रात जन्म झाला. (फोटो – इंडिया टुडे)
हरिश साळवे हे सुरुवातीपासूनच त्यांच्या कौशल्यामुळे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांना भारत सरकारनं सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केलं होतं. (फोटो – संग्रहित) -
१ नोव्हेंबर १९९९ ते ३ नोव्हेंबर २००२ या कार्यकाळात त्यांनी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणूनही काम केलं आहे. (फोटो – संग्रहित)
-
कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये साळवे यांनी भारत सरकारची बाजू मांडलेली आहे. (फोटो – संग्रहित)
-
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरून त्यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क घेतलं होतं. (फोटो – संग्रहित)
-
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आणि हरीश साळवे या दोघांचंही शिक्षण एकाच शाळेत झालेलं आहे. दोघांनीही महाराष्ट्रातील नागपूर शहरात शिक्षण घेतलं. १९७६ मध्ये साळवे दिल्लीत गेले आणि बोबडे मुंबई उच्च न्यायालयात रुजू झाले. नंतर बोबडे हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि साळवे वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले. (फोटो – संग्रहित)
मराठमोळे हरिश साळवे वयाच्या ६५ व्या वर्षी पुन्हा विवाहबंधनात, चर्चमध्ये पार पडला सोहळा
बुधवारी लंडनमधील चर्चमध्ये १५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं
Web Title: Senior advocate harish salve marries london based artist caroline brossard in church ceremony sgy