Lalu Prasad Yadav House, Bihar Election : तीन दशकांपासून जास्त काळ बिहारच्या राजकारणातील प्रमुख नेता म्हणून लालूप्रसाद यादव यांचं नाव घेतलं जातं. बिहारच्या राजकारणाची सुत्रे अनेक वर्ष लालूप्रसाद यादव यांच्या घरातूनच चालायची..पाहूयात राष्ट्रीय जनता दल(RJD) संस्थापक लालूप्रसाद यादव यांचं पटनातील घर कसं आहे…. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष सहभागी नसलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव सोशल मीडियातून मात्र नितीश कुमारांना चिमटे काढताना दिसतात. लालूप्रसाद यादव घरातही आपल्या खास बिहारी शैलीतच वावरत असतात. -
लालूप्रसाद यादव घरात असताना बंडी आणि लुंगीवर वावरतात.
अनेक वर्ष मुख्यमंत्री असलेले लालूप्रसाद यादव सर्वसामान्यासारखेच राहतात… जनता आंदोलनापासून भारतीय राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या लालूप्रसाद यादव यांचा यशाची चव चाखल्यानंतरही अंदाज बदलला नाही. लालूप्रसाद यादव आपल्या घरात गाय-म्हैस पाळतात. अनेकदा ते स्वत: दूधही काढतात. लालू प्रसाद यादव यांच्या घरासमोर मोठा असा लॉनही आहे. लॉनवर मोठी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. येथे अनेक दिग्गज राजकीय नेता बैठकीसाठी येतात. घराच्या छतावर छट पूजाची तयारी करताना राबडीदेवी यांचा फोटो मीसा भारती यांनी काढला आहे. तेजप्रताप यादव सोशल मीडियावर घरातील फोटो पोस्ट करत असतात. तेजप्रताप यादव यांच्या फोटोतून घरातील बैठक व्यवस्था दिसून येते. लॉनवर असलेल्या झोपाळ्यावर राबडीदेवी आणि तेजप्रताप यादव. तेजस्वी आणि तेजप्रताप सध्या बिहार राजकारणात चर्चेचा विषय आहे. तेजस्वींनी वडील लालू प्रसाद यादव यांचाच विक्रम मोडला. लालू प्रसाद यादव यांनी एका दिवसात १६ प्रचारसभा केल्याचा विक्रम आहे. त्यांचा हा विक्रम तेजस्वी यादवांनी शनिवारी मोडला. तेजस्वी यादवांनी शनिवारी १७ प्रचारसभा आणि दोन रोड शो करत एका दिवसात तब्बल १९ प्रचारसभा घेतल्या. (सर्व छायाचित्रे सोशल मीडियावरुन घेतले आहेत. )
CM असो वा रेल्वेमंत्री लालूंनी कधीच सोडलं नाही हे घर, पाहा त्यांच्या घराचे खास फोटो
Web Title: Bihar election see inside photos of rjd tejashwi yadav lalu prasad house in patna nck