-
स्वर्ग अशी उपमा दिलेल्या काश्मीरमध्ये यंदाच्या हंगामातील हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. रविवारी येथील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर तर काही भागात थोड्या स्वरुपात हिमवृष्टी झाली. (सर्व छायाचित्र – शोएब मसुदी)
-
उत्तर काश्मीरमधल्या गुलमर्ग येथील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट परिसरात इंचभर बर्फ साचला होता. तर श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील जवाहन टनेल भागातही इंचभर बर्फाची चादर पसरली होती.
-
गुलमर्ग येथे गेल्या काही दिवसांत ७.५ डिग्रीवर पोहोचलेलं तापमान शनिवारी रात्री ५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं.
-
काश्मीरमध्ये सध्या 'चिल्लई कलन' मोसम सुरु आहे. चिल्लई कलन म्हणजे काश्मीरमधील ४० दिवसांचा सर्वाधिक थंडीचा काळ असून या काळात येथे थंडगार वारे सुटतात आणि तापमान सातत्याने कमी होत जातं. यामुळे पाणीही गोठतं.
-
मोसमातील ताज्या हिमवृष्टीमुळे काश्मीरमधील हायवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
-
श्रीनगरमध्ये तीन ते चार इंच जाडीचा बर्फाचा थर साचला असून दक्षिण काश्मीरचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझिगंडमध्ये तब्बल ९ इंच बर्फाच्या थराची नोंद झाली आहे.
-
येथे चिल्लई-कलन मोसमाला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून तो ३१ जानेवारीला संपणार आहे. यानंतरही थंडगार वारे वाहत असतात. यामध्ये २० दिवसांचा चिल्लई-खुर्द (लहान थंडी) आणि १० दिवसांचा चिल्लई-बच्चा (मोठी थंडी) अशी अवस्था असते.
काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी, गुलमर्गमध्ये पसरली बर्फाची चादर
Web Title: Gulmarg turns white as kashmir receives fresh snowfall sdn