-
प्रसिद्धी मिळेल- ११ मार्च रोजी बुध कुंभ राशीत प्रवेश करत आहे. अमावास्या लाभस्थानात होत आहे. यशाचे नवे सूत्र हाती येईल. चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. शांतता व सबुरीने घेतलेल्या कामामध्ये कामगिरी उंचावलेली असेल. व्यवसायात निर्माण झालेल्या अस्थिरतेवर उत्तरे मिळतील. मोठी कामे करण्यासाठी सज्ज व्हाल. आश्चर्यचकित होणाऱ्या गोष्टींचा खुलासा झाल्याने उत्साह वाढता राहील. नोकरवर्गाला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. सरकारी नियमांची साथ आणि संघटनेचे पाठबळ यातून दमदार वाटचाल राहील. आर्थिक प्रकरणातून होणारे लाभ वाढताना दिसतील. सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतात राहाल. मत्रीच्या नात्यातील धागा घट्ट होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यात सुधारणा जाणवेल. शारीरिक दुखण्याचा त्रास कमी होईल. शुभ दिनांक : ७, ८ (स्मिता अतुल गायकवाड)
-
आर्थिक लाभात वाढ- पूर्वार्धात नवे प्रयोग करणे टाळा. अमावास्या कर्मस्थानातून होत असून कार्यक्षेत्रात बदल घडू शकतात. स्वत: ठरवलेले काही काम किंवा चर्चासत्र यासाठी त्या संबंधातील पूर्ण अभ्यास असणे गरजेचे ठरणार आहे. व्यवसायातील मतभेदांची मालिका कमी होईल. व्यापारी क्षेत्र उंचावल्यामुळे अवलोकन नीट करता येईल. नोकरदारवर्गाला बढतीचे रस्ते मोकळे होतील. कामातील दोष कमी झाल्याने अचूकतेचे प्रमाण वाढेल. आर्थिक लाभात वाढ होईल. राजकीय क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल. इतरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहणे सध्या तरी पटणार नाही. स्वत:चेच खरे करण्याची उमेद जागृत होईल. तरुणवर्गाने घाईने निर्णय घेण्याचा अट्टहास टाळावा. कुटुंबात झालेले मतभेद निवळतील. आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ लागतील. शुभ दिनांक : ९, १० महिलांसाठी : स्वहिताचेच निर्णय घ्या.
-
वास्तवतेला महत्त्व द्या – बुध ११ मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. अमावास्या भाग्यस्थानातून होत असून धार्मिक गोष्टीतील उत्साह वाढता राहील. जुन्या स्वप्नांना मोठे पंख फुटतील. अनुकूलतेच्या वाटेवर चालताना वास्तवतेला महत्त्व द्या. व्यावसायिकदृष्टय़ा भव्यदिव्य कामाचे मुहूर्तमेढ रोवूशकाल. त्यासाठी मिळणारा पाठिंबा फायद्याचा ठरेल. व्यापारीवर्गाला अधिक कष्टाच्या मानाने जास्तीचे फळ मिळत राहील. नोकरदारांना मानाच्या टेबलावरचे काम करायला मिळेल. मतभेदातून झालेली दुरी कमी होईल. ज्येष्ठांचे निर्णय पथ्यावर पडतील. बचतीचे धोरण अवलंबल्यास पैशांची अडचण जाणवणार नाही. स्थावरच्या प्रश्नात मोठी वाटचाल करता येईल. सार्वजनिक क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबत स्वत:च्याही प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक : ७, ८ महिलांसाठी : गरज असेल तिथेच प्रतिक्रिया व्यक्त करा.
-
रागावर नियंत्रण ठेवा- कुंभ राशीतील बुध अष्टमात ११ मार्च रोजी प्रवेश करीत आहे. चंद्र षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे भ्रमण करीत आहे. अमावास्या अष्टमस्थानात होत आहे. या अमावास्या कालावधीत मानसिकता नीट ठेवून रागावर नियंत्रण ठेवा. विनाकारण धाडस वाढवू नका. प्रत्येक गोष्टीतील प्रतिकूलता कमी करण्याचा प्रयत्न करा. होणाऱ्या नव्या ओळखीतून व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न करा. व्यापारी क्षेत्रातील उलाढाली वाढवण्यासाठी गुंतवणूक हाच एक पर्याय स्वीकारू नका. नोकरदारवर्गाला वारंवार झालेले कामातील बदल पचनी पडणार नाहीत. कामाची जबाबदारी इतरांवर न टाकता स्वत:लाच पूर्ण करावी लागेल. आर्थिक बाबतीत झालेली गुंतागुंत वेळीच मिटवा. सामाजिक क्षेत्रातील वाद-विवाद बाजूला ठेवा. स्वत:च्या हिताचे निर्णय घेऊन प्रकृती जपा. शुभ दिनांक : ९, १० महिलांसाठी : बोलण्यावर ताबा ठेवा
-
चौकस विचार करा- कुंभ राशीत प्रवेश करणारा बुध सप्तमस्थानात ११ मार्च रोजी येत आहे. अमावास्या सप्तमस्थानातून होत असून वैवाहिक जोडीदाराशी मतभेद न वाढवता शांतपणे राहा. अनेक जटिल समस्यांतून सुटका होईल. अडथळ्यांचे प्रमाण कमी झाल्याने व्यक्तिगत हालचाली करता येतील. कामाच्या किरकोळ चुकांवरही वेळीच लक्ष द्या. फायदेशीर गोष्टींचा विचार करून भांडवलात वाढ करा. गोड बोलून कार्यभाग साधून घेणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहा. नोकरदारवर्गाने वरिष्ठ व्यक्तींची चर्चा आपसात करणे टाळा. व्यावहारिकता सोडून वागू नका. स्वप्नांच्या मागे लागून नियोजन बिघडणार नाही, याची दक्षता घ्या. पैशांची भासणारी चणचण कमी कशी होईल, याचे नियोजन करा. सामाजिक ओळखीचा उपयोग करून घेऊ शकाल. स्थावरचा प्रश्न सोडवताना चौकस विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. शुभ दिनांक : ७, ८ महिलांसाठी : अवघड काम पूर्ण कराल.
-
खंबीरपणे निर्णय घ्याल- ११ मार्च रोजी षष्ठस्थानात बुध प्रवेश करत आहे. अमावास्या ही षष्ठस्थानातून होत असून व्यसनी व कुसंगती माणसांसोबतचा वावर आवर्जून टाळा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. फुकट मिळते म्हणून मागे धावणे इष्ट ठरणार नाही. व्यवसायात गुंतवणुकीचे मार्ग विचारपूर्वक हाताळा. लगेच निर्णय घेणे अपेक्षित नसले तरी जमवाजमव सुरू करायला हरकत नाही. नोकरदारवर्गाने स्वीकारलेली आव्हाने वेळेत पूर्ण होण्याचे संकेत दिसू लागतील. हिशोबाचे ताळतंत्र नेहमीप्रमाणे नसून त्यात बदल झालेला असेल. नव्या नोकरीतून क्षितिज व्यापक होईल. अर्थ व्यवहाराला कलाटणी मिळेल. त्यामुळे खंबीरपणे निर्णय घ्याल. सार्वजनिक ठिकाणी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कौटुंबिक जीवनात चांगले सूर जुळलेले राहतील. खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळा. शुभ दिनांक : ९, १० महिलांसाठी : कामाचा वेग व अचूकता वाढवावी लागेल.
-
शुभ दिनांचा सप्ताह- बुध ११ मार्च रोजी पंचम स्थानात कुंभ राशीत प्रवेश करेल. अमावास्यासुद्धा पंचमस्थानात होत आहे. मुलांच्या कार्यशैलीतील परिणामांची जाणीव जात्यावेळी करून देणे इष्ट राहील. भावनिक जग वेळीच लक्षात घ्या. स्वतच्या कामगिरीचा उंचावलेला आलेख आत्मविश्वास वाढवेल. अनेकदा शुभ संदेशातून तूळ राशिगटाला यशाकडे वाटचाल करत असल्याचे संकेत मिळतील. व्यापार सल्ला, कायक्षेत्रातून मोठय़ा संधी उपलब्ध होतील. नोकर वर्गाला संरक्षण क्षेत्रातून मिळालेला प्रस्ताव फलदायी ठरेल. काही ठिकाणी निष्कारण निर्माण झालेले अडथळे दूर करू शकाल. रोख व्यवहाराच्या उलाढालीतून बचत वाढती राहील. राजकीय जीवनात नेतृत्वाच्या संधी मिळतील. कौटुंबिकदृष्टय़ा शुभ दिनांचा सप्ताह राहील. प्रकृती ठणठणीत असेल. शुभ दिनांक : ८, १० महिलांसाठी : आशा-आकांक्षांना नवे वळण मिळेल.
-
कर्तृत्वक्षेत्र विस्तारेल – चतुर्थ स्थानात कुंभ राशीत बुध ११ मार्चला प्रवेश करेल. अमावास्यासुद्धा चतुर्थ स्थानातच होत आहे. सप्ताहातील अमावस्या सावकाशीने पाऊल टाकण्यास सुचवत आहे. वास्तुविषयक असलेला प्रश्न टोकाला जाऊ देऊ नका. व्यवसायात छोटय़ा गोष्टीतून आपल्याला मार्गक्रमण करता येईल. कला क्षेत्रातून येणाऱ्या मागणीतून प्रगतीचा मार्ग दिसू लागेल. नोकरदार वर्गाला स्वतचा अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर सतर्क राहत निर्णय घेता येतील. वरिष्ठ व्यक्तींकडून कामाची पोचपावती मिळाल्यामुळे कर्तृत्व क्षेत्र विस्तारले. आर्थिकदृष्टय़ा सप्ताह बऱ्याच अंशी शुभफलदायी ठरेल. राजकीय क्षेत्रात सुवार्ता समजेल. कुटुंबाची साथ मिळेल. वैवाहिक जोडीदाराचा आपल्यावर असलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नशील राहा. शारीरिकदृष्टय़ा प्रकृती उत्तम राहील. शुभ दिनांक : ७, ८ महिलांसाठी : सकारात्मक प्रयत्नांतून यश मिळेल.
-
मार्ग मिळत राहतील- तृतीय स्थानात बुध कुंभ राशीत ११ मार्चला प्रवेश करेल. आवडीच्या क्षेत्रातून पुढे जाण्यासाठीचा कालावधी चांगला राहील. अमावास्या तृतीय स्थानात होत आहे. ताकसुद्धा फुंकून प्यावे हे मागील अनुभवातून शिकला असाल. व्यापारी क्षेत्रात कामाची धांदल उडेल. ग्राहकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद यातून प्रगतीचे मोठे दार उघडेल. व्यापाराची एखादी नवी आघाडी उघडता येईल. कर्जप्रकरणे मनासारखी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरदार वर्गाला दिलासादायक गोष्टी घडतील. नोकरीतील चांगले दिवस सध्या पाहावयास मिळतील. पैशांचे गणित योग्यप्रकारे जुळवता येईल. सामाजिक क्षेत्रात परोपकाराच्या फंदात पडू नका. भावंडांशी वाढणारा दुरावा कमी करा. शेजारी धर्माशी असणारा संवाद जेवढय़ास तेवढा ठेवा. आरोग्य प्रश्नात योग्य मार्ग मिळेल. शुभ दिनांक : ७, ९ महिलांसाठी : आध्यात्मिक गोष्टीतून मानसिक समाधान लाभेल.
-
संघर्ष कमी होईल- कुंभ राशीतील बुध द्वितीय स्थान ११ मार्चला प्रवेश करेल. अमावास्यासुद्धा द्वितीय स्थानात होत आहे. या कालावधीत कुटुंबाशी हुज्जत न घालता शांत राहणे केव्हाही चांगले. स्वतचे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. पूर्वार्धात खर्च वाढणार नाही याची काळजी घ्या. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे, हा अनुभव विसरू नका. भागीदारी क्षेत्रात दिलासा मिळणाऱ्या गोष्टी घडतील. इतरांवर अवलंबून राहण्याचा संघर्ष कमी होईल. नोकरदार वर्गाने आपल्या कामाच्या नोंदी व्यवस्थित ठेवणे योग्य राहील. व्यावहारिक गोष्टी जबाबदारीने हाताळा. आर्थिक दृष्टय़ा योग्य पल्ला गाठता येईल. राजकीय क्षेत्रात होणारा प्रस्ताव मान्य करावा लागेल. विवाहविषयक बठकीतून होणारे सकारात्मक निर्णय यशदायी ठरतील. कुटुंब आनंदी असेल. आरोग्याच्या बाबतीत आळस करू नका. शुभ दिनांक : ९, १० महिलांसाठी : विचारपूर्वक निर्णय घ्या.
-
आशावादी दृष्टिकोन – तुमच्याच राशीत असलेला बुध ११ मार्चला प्रथम स्थानात प्रवेश करीत आहे. अमावास्याही प्रथम स्थानातूनच होत आहे. चंद्र लाभस्थानातून भ्रमण करत आहे. कामातले दोष कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. आगामी काळाचे नियोजन करणे आपल्या हिताचे ठरेल. व्यापाऱ्यांना आयात-निर्यातीत आशावादी दृष्टिकोन राहील. कलाक्षेत्रातील लोकांनी आपल्या मर्यादा आधीच ठरवून त्या ओलांडू नका. सरकारी नोकरदार क्षेत्रातील अधिकारीवर्गाना कामाचे प्रमाण कमी झालेले असेल. एखादे महत्त्वाचे मिळालेले पद पुढील काळासाठी उपयुक्त ठरेल. आर्थिकदृष्टय़ा ठरल्याप्रमाणे व्यवहार होत राहतील. सार्वजनिक क्षेत्रात सध्या मन लागणार नाही. मुलांविषयी घेतलेले निर्णय योग्य असतील. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. शुभ दिनांक : ७, ८ महिलांसाठी : थांबू नका. प्रश्नांची उत्तरेही शोधा.
-
प्रेरणा मिळेल- व्यवस्थापनातून होणारी अमावास्या एक पाऊल मागे येण्यासाठी सुचवत आहे. नेमकेपणाने काम करा. अडथळा कमी करून योग्य दिशा शोधा. बुध कुंभ राशीत व्ययस्थानात ११ मार्चला प्रवेश करत आहे. व्यवसायात मधला मार्ग काढणे केव्हाही चांगले ठरेल. उत्पादन वाढीसाठी योग्य असे नियोजन केल्यास, निष्कारण होणारे प्रश्न कमी होतील. नोकरदार वर्गाचे दूरगामी निर्णय शक्यतो लांबणीवर जाणार नाहीत. कामाचे दबावतंत्र कमी झाल्यामुळे मनाला प्रेरणा मिळेल. सध्या अपेक्षित नसले तरीही मोठी आर्थिक तरतूद उभी करता येईल. राजकीय क्षेत्रातील अडथळ्यांची शर्यत कमी होताना दिसेल. मत्रीच्या नात्यातील मनमोकळेपणा जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या बाबतीत निर्णय ज्येष्ठ व्यक्तींकडे सोपवून द्या. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची आखणी कराल. प्रकृती चांगली असेल. शुभ दिनांक : ८, १० महिलांसाठी : पाककलेची आवड निर्माण होईल.
कसा असेल हा आठवडा? काय सांगतंय राशीभविष्य…
काय म्हणतात ग्रह….
Web Title: Weekly horoscope rashi bhavishya weekly rashi bhavishya astrology in marathi marathi horoscope bmh