-
राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १४ मार्च रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा अवघ्या तीन दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जातोय. (सर्व फोटो : सागर कासार, लोकसत्ता डॉट कॉम प्रतिनिधी)
-
अचानक करोनाचे कारण देत एमपीएससीची परीक्षाच पुढे ढकलण्याच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत.
-
पुणे शहरातील नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी केला.
-
सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला.
-
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी रस्त्याची दुसरी बाजू विद्यार्थींनी अडवून ठेवत एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
“इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलणं चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या तीन दिवस आधी त्या पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
-
विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकरही विद्यार्थ्यांसोबत रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले.
-
रस्त्यावर आडवं पडून रस्तारोको करत पडळकर यांनी विद्यार्थ्यांसोबत या आंदोलनात सहभाग नोंदवला.
-
काही ठिकाणी विद्यार्थींनी पुस्तके फाडून परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध केलाय.
-
एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी पुण्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विद्यार्थी दाखल झालेत.
-
मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेक विद्यार्थ्यांना आता परीक्षा झाल्या नाही तर पुन्हा पुण्यात येण्या जाण्याच्या खर्च करावा लागणार आहे.
-
निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत?, असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.
-
-
'ठाकरे सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय' अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे.
-
आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या पाहता अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.
Photos: तुमच्या पोराबाळांची लग्न, निवडणुका, प्रचार करोनात चालला मग परीक्षा का नकोत?; MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर
परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील निर्णयानंतर पुण्यात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत
Web Title: Mpsc student protest against decision of maharashtra government to postpone exams svk 88 scsg