• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. jejuri khandoba gad shivling mahashivratr sgy

जेजुरीमधील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दरवाजे उघडले; पहा दुर्मिळ फोटो

वर्षातून फक्त महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात

Updated: September 9, 2021 00:33 IST
Follow Us
  • श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दरवाजे बुधवारी मध्यरात्री उघडण्यात आले. वर्षातून फक्त महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मोजके पुजारी व मानकरी यांच्या हस्ते तिन्ही शिवलिंगावर अभिषेक-पूजा करण्यात आली. शिवलिंगाचे दर्शन घेताना गर्दी होऊ नये म्हणुन यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.
    1/5

    श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दरवाजे बुधवारी मध्यरात्री उघडण्यात आले. वर्षातून फक्त महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मोजके पुजारी व मानकरी यांच्या हस्ते तिन्ही शिवलिंगावर अभिषेक-पूजा करण्यात आली. शिवलिंगाचे दर्शन घेताना गर्दी होऊ नये म्हणुन यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.

  • 2/5

    खंडोबाच्या मुख्य उत्सवापैकी महाशिवरात्रीला वेगळे महत्व आहे.त्रिलोकातील दर्शनाचा लाभ यावेळी घेता येतो. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक तर मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक व गाभार्‍यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते. (जेजुरी मुख्य मंदिरात असलेले पाताळातील शिवलिंग)

  • 3/5

    जेजुरीत जमावबंदीचा आदेश लागू केल्याने शुकशुकाट जाणवत होता.पोलिस प्रशासनाने खंडोबागडाकडे जाण्यार्‍या पायर्‍यांवरच लोखंडी कठडे उभारल्याने कोणीही गडावर गेले नाही.

  • 4/5

    महाशिवरात्रीला त्रिलोकातील दर्शनासाठी हजारो ग्रामस्थ, भाविक रात्रीपासूनच गडावर गर्दी करतात. चार-पाच तास रांगेत उभे राहतात. यंदा मात्र गड भाविकांविना सुनासुना वाटत होता. कोठेही बेल-भंडार्‍याची उधळण नाही की सदानंदाचा येळकोट असा जयघोष नाही अशा वातावरणातच यंदाचा महाशिवरात्री उत्सव पार पडला. (मुख्य मंदिरातील शिवलिंग याला भूलोकीचे शिवलिंग म्हणतात)

  • शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री तिन्ही शिवलिंगाचे पूजन होऊन दोन कळसातील व भुगर्भातील शिवलिंग मंदिर बंद करण्यात येणार आहे.शनिवारपासून (दि.१३) भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे. (मुख्य मंदिराच्या कळसामध्ये असलेले स्वर्गलोकीचे शिवलिंग)

Web Title: Jejuri khandoba gad shivling mahashivratr sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.