• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. weekly horoscope astrology in marathi marathi horoscope rashi bhavishya weekly rashi bhavishya bmh

कसे आहेत या आठवड्यात ग्रह?; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य…

साप्ताहिक राशीभविष्य; हा आठवडा कसा जाणार?

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • मेष : नियमांच्या चौकटीत राहा १४ मार्च रोजी रवी मीन राशीत प्रवेश करत आहे. शुक्रही मीन राशीत १६ मार्च रोजी प्रवेश करत आहे. रवी, शुक्र हे व्ययस्थानात येत असून थोडी फार सुधारणा असेलही, मात्र फार मोठ्या अपेक्षांच्या मागे लागणे हिताचे ठरणार नाही. पूर्वार्धात आळस वाटेल. समोर असलेली कामे शक्य तेवढी बिनचूक करणे आपल्या हाती असेल. नोकरदार व्यक्तींना भेटीगाठींमधून समाधान मिळेल. कामांमधील वेग वाढता राहील. व्यवसायामध्ये फार मोठ्या तडजोडी आवश्यक नसल्या तरी छोट्या-मोठ्या बदलामुळे बरेच काही साध्य करू शकाल. नियमांच्या चौकटीत राहूनच कामे करा. पैशांच्या बाबतीत थेंबे थेंबे तळे साचे हे विसरू नका. राजकीय क्षेत्रात जुन्या गोष्टी उगाळत बसणे इष्ट ठरणार नाही. घरातील ज्येष्ठांचा र्पांठबा मिळवण्यासाठी प्रयत्न करा. प्रकृतिस्वास्थ्य जपा. शुभ दिनांक : १८, १९ महिलांसाठी : मोठ्या मनाने केलेली कृती यशदायी ठरेल. (स्मिता अतुल गायकवाड)
    1/12

    मेष : नियमांच्या चौकटीत राहा १४ मार्च रोजी रवी मीन राशीत प्रवेश करत आहे. शुक्रही मीन राशीत १६ मार्च रोजी प्रवेश करत आहे. रवी, शुक्र हे व्ययस्थानात येत असून थोडी फार सुधारणा असेलही, मात्र फार मोठ्या अपेक्षांच्या मागे लागणे हिताचे ठरणार नाही. पूर्वार्धात आळस वाटेल. समोर असलेली कामे शक्य तेवढी बिनचूक करणे आपल्या हाती असेल. नोकरदार व्यक्तींना भेटीगाठींमधून समाधान मिळेल. कामांमधील वेग वाढता राहील. व्यवसायामध्ये फार मोठ्या तडजोडी आवश्यक नसल्या तरी छोट्या-मोठ्या बदलामुळे बरेच काही साध्य करू शकाल. नियमांच्या चौकटीत राहूनच कामे करा. पैशांच्या बाबतीत थेंबे थेंबे तळे साचे हे विसरू नका. राजकीय क्षेत्रात जुन्या गोष्टी उगाळत बसणे इष्ट ठरणार नाही. घरातील ज्येष्ठांचा र्पांठबा मिळवण्यासाठी प्रयत्न करा. प्रकृतिस्वास्थ्य जपा. शुभ दिनांक : १८, १९ महिलांसाठी : मोठ्या मनाने केलेली कृती यशदायी ठरेल. (स्मिता अतुल गायकवाड)

  • 2/12

    वृषभ : स्वप्न साकार होईल लाभस्थानात मीन राशीत रवी १४ मार्चला प्रवेश करेल. शुक्र १६ मार्चला मीन राशीत प्रवेश करेल. अनुकूल असलेले ग्रहमान निश्चित सकारात्मकता वाढवणारे आहे. नोकरदार व्यक्तींची वाटचाल योग्य पद्धतीने राहील. अपेक्षित कामे मनासारखी चालू राहतील. अनेक क्षेत्रांत अधिकार प्राप्त होईल. मोठ्या व्यवहारात थोरामोठ्यांचा सक्रिय आशीर्वाद मिळेल. आयात-निर्यात व्यापारात प्रगती साधता येईल. उत्पन्नाचा नवा स्रोत हाती येईल. अनेकांची मदत मिळेल. र्आिथक गुंतवणूक आगामी काळासाठी उपयोगी पडेल. नव्या वास्तूचे स्वप्न साकार होईल. राजकीय क्षेत्रात मनासारखी कामे होत राहतील. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. मित्रपरिवार मदतीस धावून येईल. घरगुती जीवनात काही शुभ प्रसंगांच्या नोंदी करू शकाल. उपासना फलद्रूप होईल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक : १४, १५ महिलांसाठी : हाती घेतलेला वसा पूर्ण कराल.

  • 3/12

    मिथुन : चंचलता वाढेल १४ मार्च रोजी दशमस्थानात रवी मीन राशीत प्रवेश करेल. शुक्र दशमस्थानात १६ मार्चला प्रवेश करेल. न जमणाऱ्या गोष्टींसाठी मात्र मुद्दे प्रतिष्ठेचे बनवू नका. तोंडापर्यंत येणारा घास कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे फिरणे, असा कालावधी संपण्याच्या मार्गी असेल. नोकरदार वर्गाला कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मोठी मदत मिळत राहील. कामात योग्य असा परतावा मिळेल. व्यवसायात भागीदारीमध्ये होणारे अनुकूल बदल स्वत:चे अस्तित्व निर्माण करेल. स्पर्धा क्षेत्रात असलेला नवा दबावगट कमी होत राहील. काही मोठे प्रकल्प हाती येतील. त्यामुळे चंचलता वाढेल. खर्च कमी केल्यास र्आिथक आवक चांगली असेल. राजकीय क्षेत्रात भावनिक संवेदनशीलता टाळा. कुटुंबीयातील कोणाचे अनपेक्षित वागणे यावर विशेष विचार करणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करणे टाळा. शुभ दिनांक : १६, १७ महिलांसाठी : कोणतीही भडक विधाने करू नका.

  • 4/12

    कर्क : आनंददायी सप्ताह रवी मीन राशीत १४ मार्च रोजी भाग्यस्थानात प्रवेश करेल. शुक्र १६ मार्चला मीन राशीत प्रवेश करेल. चंद्र भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे भ्रमण करत आहे. शासकीय कर्मचारी वर्गाला दिलासा देणाऱ्या गोष्टी घडतील. वरिष्ठांच्या सक्रिय सहभागामुळे अनेक कामांत सफलता मिळेल. व्यवसायात चालू असलेली प्रगतीची गाडी वेगाने चालू शकेल. अंगीभूत कलागुण व कौशल्य विकसित करता येईल. नव्या व्यापारात चांगला बस जमेल. कर्ज प्रकरणात आलेले अडथळे दूर होतील. र्आिथक बाबतीत अनपेक्षित बदल घडतील. समाजमाध्यमाचा योग्य कारणासाठी वापर कराल. मुलांच्या बाबतीत घाईचा निर्णय टाळा. कौटुंबिकदृष्ट्या आनंददायी सप्ताह असेल. वैवाहिक जोडीदाराविषयी अभिमान वाटेल. आरोग्याच्या बाबतीत प्रगतीचे पाऊल असेल. शुभ दिनांक : १४, १५ महिलांसाठी : बोलण्यातील स्वर नम्र असल्याने कामे होत राहतील.

  • 5/12

    सिंह : चिकाटीचे फळ मिळेल अष्टमस्थानात रवी १४ मार्च रोजी शुक्र १६ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करीत आहे. पूर्वार्ध अनुकूल वाटला नाही, तरी अवघडही नाही. नोकरीमध्ये उडालेली कामाची धांदल कमी करण्याचा प्रयत्न करा. पत्रव्यवहार करताना पुरेशी काळजी घ्या. अधिकारी वर्गाला कल्पना दिल्याशिवाय कोणताही व्यवहार करणे इष्ट ठरणार नाही. महत्त्वाच्या व्यासपीठावरून कलागुण प्रर्दिशत करता येईल. त्यातून चाहता वर्ग वाढता राहील. व्यापारी वर्गाला गिऱ्हाईकांची मने वळविण्यात यश मिळेल. प्रतिकूलतेवर मात कराल. संघर्षदायक गोष्टींचा आडवळणी मार्ग पार होईल. कायम टिकवून ठेवलेल्या चिकाटीचे फळ मिळेल. अर्थव्यवहाराला नवी चालना मिळेल. राजकीय क्षेत्रात बोलण्यातून शत्रुत्व वाढवू नका. कौटुंबिक कलह कमी करा. जुन्या व्याधींकडे वेळीच लक्ष द्या. शुभ दिनांक : १७, १८ महिलांसाठी : अडचणींमधूनच नव्या संधी शोधा.

  • 6/12

    कन्या : नियोजनाला महत्त्व द्या सप्तमस्थानात रवी १४ मार्च रोजी व शुक्र १६ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करीत आहे. चंद्र भाग्यस्थानातून प्रवेश करेल. जुन्या बदललेल्या प्रश्नांना चांगले मार्ग मिळतील. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आतून उत्साह वाढवा. नोकरदार वर्गाला आपले जास्तीचे कौशल्य पणाला लावावे लागेल. त्यातूनच बढतीचे मार्ग मोकळे होतील. नोकरदारांनी आंधळा विश्वास मात्र कोणावर ठेवणे योग्य राहणार नाही. व्यापारी क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला टाळू नका. त्यासाठी नियोजनाला महत्त्व द्या. सप्ताहात पैशाचे गणित फसणार नाही, याची दक्षता घ्या. गुंतवणुकीसाठी आलेले पर्याय योग्य असल्याची खात्री करा. राजकीय क्षेत्रातील लोकांना ताकसुद्धा फुंकून प्यावे लागेल. घरगुती प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळेल. शारीरिकदृष्ट्या योग्य साधनेला महत्त्व द्या. शुभ दिनांक : १९, २० महिलांसाठी : व्यावहारिक गोष्टींना जास्त महत्त्व द्या.

  • 7/12

    तूळ : कामातील चुका टाळा चंद्र षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे भ्रमण करीत आहे. सतर्कता बाळगून कोणतेही काम केल्यास अडचण वाटणार नाही. रवि १४ मार्च रोजी मीन राशीत शुक्र १६ मार्च रोजी मीन राशीत षष्ठ स्थानात प्रवेश करीत आहे. अतिरिक्त धावपळीला महत्त्व देऊ नका. सावकाशीने पाऊल उचला. सर्वांना सामावून घेत गोड बोलून कामे करून घेण्यावर भर द्या. नोकरदार वर्गाने कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. नोकरीमध्ये पूर्ण अनुकूलता नसली तरी स्वप्रयत्नाने यश खेचून आणा. व्यवसायामध्ये मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नका. अप्रत्यक्षरीत्या कोणावर आरोप करणे योग्य ठरणार नाही. स्वतङ्मच्या कामाव्यतिरिक्तइतरत्र लक्ष देऊ नका. कामातील चुका टाळा. सामाजिक क्षेत्रातील शंकांचे वादळ वेळीच थांबवा. आरोग्याची काळजी घ्या. शुभ दिनांक : १६ , १७ महिलांसाठी : कोणताही अतिरेक करू नका.

  • 8/12

    वृश्चिक : अडचणींवर मात करा पंचमस्थानात रवि १४ मार्च रोजी व शुक्र १६ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करेल. स्वत:च्या जागृत ठेवलेल्या आत्मविश्वासातून नव्या शुभ प्रसंगांना सामोरे जाऊ शकाल. नोकरदारांनी नको त्या माणसांची केलेली बरोबरी यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात. केवळ आपला मोठेपणा मिळवून, मिरवण्यापेक्षा व्यावहारिक यशावर भर द्या. व्यावसायिकदृष्ट्या गाडी नेमकी का थांबली, याचा विचार करा. कोणतेही अनुचित पाऊल टाकणे हिताचे नाही. ग्राहकांशी कशा पद्धतीने सूर जुळवता येईल. याकडे लक्ष द्या. चतुराईने अडचणींवर मात करा. र्आिथक बळ एकवटेल. सामाजिक कार्यातील सहभाग जेवढ्यास तेवढा ठेवा. कुटुंबाला सामावून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मतभेद ताणू नका. आरोग्य तंत्राकडे वेळीच लक्ष द्या. शुभ दिनांक : १४ , १५ महिलांसाठी : ज्येष्ठांचे आशीर्वाद मोलाचे ठरतील.

  • 9/12

    धनू : वरिष्ठांची कृपा राहील चतुर्थ स्थानात रवी १४ मार्चला मीन राशीत व शुक्र १६ मार्चला मीन राशीत प्रवेश करेल. शुभाशुभ अशा दोन्ही रुळावरून जाणाऱ्या आपल्या गाडीला संतुलित ठेवा. चांगल्या वाईट प्रसंगातून जाताना आपल्या निर्णय क्षमतेचा कस लागेल. वाईट दिवस संपत आल्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरदारांना सध्या सरकारी नियमांकडे लक्ष देणे जास्त गरजेचे ठरेल. कोणतेही मोठे बदर्ल ंकवा धाडसी निर्णय सध्या नको. कामाचे तास वाढवावे लागतील. व्यापारी वर्गाला नव्या व्यवसायात व्यापाराचा चांगला उत्कर्ष बघता येईल. सर्वतोपरी अनुकूलता असेल. वरिष्ठांची कृपा राहील. कष्टानंतर का होईना, पण यश मिळेल. र्आिथक उद्दिष्टपूर्ती होत राहील. घरगुती वातावरण आनंदी असेल. उष्णतेचे विकार जपा. शुभ दिनांक : १५ , १६ महिलांसाठी : विविध समस्यांचे मळभ दूर ठेवा.

  • 10/12

    मकर : पोषक वातावरण असेल पराक्रम स्थानात रवि १४ मार्च रोजी तर शुक्र १६ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करेल. सप्ताहात वाटचाल भरधाव राहील. कसोटीवर उतरून स्पर्धेत यश मिळवाल. नोकरदार वर्गाला संशोधन क्षेत्रात मोठे पाऊल उचलता येईल. विचार करून घेतलेले निर्णय व केलेली अंमलबजावणी उपयुक्त ठरेल. आपल्या कामाला उभारी मिळत राहील. व्यवसायात अडलेल्या कामाला मार्ग मिळत राहतील. अनेक क्षेत्रात यशाचा झेंडा उभारू शकाल. नव्या व्यापारांना थोरामोठ्यांच्या ओळखीतून फायदा होईल. दळणवळण, साहित्य सर्व प्रकारची माध्यमे इत्यादी क्षेत्रात योग्य प्रमाणात परतावा मिळेल. पैशांची कामे मनासारखी होत राहतील. सामाजिक प्रकल्प मार्गी लागतील. घरगुती वातावरण पोषक राहील. प्रकृती उत्तम असेल. शुभ दिनांक : १४ , १६ महिलांसाठी : कौतुकास्पद कामगिरी कराल.

  • 11/12

    कुंभ : जमेच्या गोष्टी घडतील द्वितीय स्थानात रवी १४ मार्च रोजी व शुक्र १६ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करत आहे. झालेली दमछाक आता कमी होऊ लागेल. अनेक समस्यांतून मार्ग दिसू लागतील. नोकरदार वर्गाने प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करणे योग्य ठरेल. जुने अनुभव नीट तपासा. शासकीय कर्मचाऱ्याने कोणताही अतिरेक न केलेला बरा. खरेदी-विक्रीचे व्यवहार अवश्य करा. पण तोंडी व्यवहार टाळा. व्यवहारात कागदपत्रे गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्या. अपेक्षित साध्य गाठण्यासाठी सध्या उशीर लागणार नाही. परिस्थितीवर आपली पकड असणार आहे. निर्णयसुद्धा अपेक्षेप्रमाणे घेता येतील. मात्र त्या त्या ठिकाणचे नियम व कायदा यांचे संकेत ओलांडू नका. अनेक बाबतीत जमेच्या गोष्टी घडतील. राजकीय क्षेत्रात ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवू नका. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. शुभ दिनांक : १४ , १५ महिलांसाठी : तडजोड म्हणजे पूर्णत: शरणागती नव्हे, हे लक्षात ठेवा.

  • 12/12

    मीन : प्रयत्न सफल होतील प्रथम स्थानात रवी १४ मार्च रोजी व शुक्र १७ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करत आहे. थेट असा फायदा दृष्टिक्षेपात असेल. आपल्या मतांना र्पांठबा मिळेल. नोकरदारांना दिलेला जास्तीचा वेळ आगामी काळासाठी महत्त्वाचा ठरेल. कामाचे तास वाढले तरी परताव्याची शक्यता वाढेल. नवे प्रयोग फलदायी ठरतील. व्यापारी वर्गाला नव्या ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम राहील. अनेक बाबतीत स्वत:चे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायातील व्यवहार मनासारखे होतील. कोर्टकचेरीची कामे वेळेत पूर्ण करा. र्आिथकदृष्ट्या प्रयत्न सफल होतील. सामाजिक क्षेत्रातील प्रयत्न सत्कारणी लागतील. कौटुंबिक जीवनातून र्पांठबा मिळत राहील. वैवाहिक जीवनात हास्य फवारे उडत राहतील. आरोग्य तंत्र उत्तम ठेवाल. शुभ दिनांक : १४ , १७ महिलांसाठी : मिळणाऱ्या संधीचा फायदा करून घ्या.

Web Title: Weekly horoscope astrology in marathi marathi horoscope rashi bhavishya weekly rashi bhavishya bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.