-
-
(संग्रहित छायाचित्र)
-
२५ फेब्रुवारी – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानाजवळ आरोपींनी स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ बेवारस सोडली, कारवर अंबानी यांच्या ताफ्यातील कारचा नोंदणी क्रमांक. (छायाचित्र। एएनआय । इंडियन एक्स्प्रेस)
-
२६ फेब्रुवारी – गुन्हे शाखेच्या दाव्यानुसार अंबानी यांची खासगी सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्याने कार पाहिली, पोलिसांना कळवले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला, पोलीस आयुक्तांकडून सहायक निरीक्षक सचिन वाझे यांची निवड. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
२७ फेब्रुवारी- ही स्कॉर्पिओ कार ठाण्यातील ऑटोमोबाइल व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या ताब्यातून १७ फेब्रुवारीला चोरी, विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याची माहिती उघड. (छायाचित्र। एएनआय )
-
२८ फेब्रुवारी – एनआयए, एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून मनसुख यांची चौकशी करण्यात आली. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
३ मार्च – तपास पुढे सरकत नसल्याने सहायक आयुक्त नितीन अलकनुरे यांच्याकडे तपास सोपवला. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
४ मार्च – तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदर येथे जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले मनसुख हिरेन बेपत्ता. (छायाचित्र। एएनआय )
-
५ मार्च – मुंब्रा खाडीत रेती बंदर येथून मनसुख हिरेन यांचा मृतदेह हस्तगत, घातपात असल्याचा कुटुंबाकडून संशय व्यक्त, तत्पूर्वी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वाझे यांच्यावर गंभीर आरोप. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
६ मार्च – गृहविभागाकडून अंबानी धमकी प्रकरण, मनसुख यांच्या ताब्यातील कारची चोरी आणि मनसुख यांचा संशयास्पद मृत्यू या तिन्ही प्रकरणांचा तपास एटीएसकडे वर्ग. (छायाचित्र। एएनआय )
-
७ मार्च – मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा मनसुख यांच्या कुटुंबियांचा संशय व्यक्त करणारा जबाब, एटीएसकडून अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
८ मार्च – अंबानी धमकी प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे केंद्रीय गृहविभागाचा एनआयएला आदेश, तर एटीएसकडून मनसुख हत्या प्रकरणात वाझे यांची आठ तास चौकशी. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
१२ मार्च – ठाणे सत्र न्यायालयाने मनसुख हत्या प्रकरणात वाझे यांची अंतरिम अटकपूर्व जामीनाची मागणी फेटाळली. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
१३ मार्च – वाझे यांची एनआयएकडून दिवसभर चौकशी, रात्री १२च्या सुमारास अटक. सचिन वाझे यांना भारतीय दंड संहितेतील २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० ब आणि स्फोटक पदार्थ कायद्यातील ४(अ)(ब)(१) या कलमांन्वये अटक करण्यात आली. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)
-
१४ मार्च – गुन्ह्याात वापरलेली इनोव्हा कार जप्त, वाझे यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी. (छायाचित्र। एएनआय )
घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक; कोणत्या दिवशी काय घडलं?
त्यात होत्या अडीच किलो जिलेटिनच्या सुट्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारे एक पत्र
Web Title: Ambani residence bomb scare case sachin vaze mansukh hiren death case know everything about case bmh