Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bihar primary health centre in madhubani hospital only exists on paper no doctors nurses sanitation workers bmh

फोटो बघून विश्वास बसणार नाही, पण हे रुग्णालय सरकार दफ्तरी आहे सुरू

“इथे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टचं ध्वजारोहण वगळता दुसरं काहीही होत नाही”

May 24, 2021 16:25 IST
Follow Us
  • देशात कव्हे नव्हे इतका आरोग्याच्या मुलभूत सुविधांचा प्रश्न करोनामुळे चव्हाट्यावर आला आहे. करोनाच्या शिरकावानंतर आरोग्य व्यवस्थेतील दोष समोर येताना दिसत असून, बेडसह मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे. (संग्रहित छायाचित्र। पीटीआय)
    1/10

    देशात कव्हे नव्हे इतका आरोग्याच्या मुलभूत सुविधांचा प्रश्न करोनामुळे चव्हाट्यावर आला आहे. करोनाच्या शिरकावानंतर आरोग्य व्यवस्थेतील दोष समोर येताना दिसत असून, बेडसह मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे. (संग्रहित छायाचित्र। पीटीआय)

  • 2/10

    करोनामुळे सार्वजनिक रुग्णालयातील सोयीसुविधांचा पर्दाफाश होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू उभारण्यात आलेल्या बिहारमधील एका रुग्णालयाचं वास्तवही आता समोर आलं आहे. (छायाचित्र। एएनआय)

  • 3/10

    देशातील अनेक राज्यांमध्ये करोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून, बिहारमधील एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे फोटो समोर आले आहेत. इथे डॉक्टर, नर्स आणि स्वच्छता कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत. पण, फोटो बघून याची कुठेही जाणीव होत नाही. (छायाचित्र। एएनआय)

  • 4/10

    हे फोटो बंद पडलेल्या रुग्णालयाचे नाहीत. तर सरकार दफ्तरी हे रुग्णालय सुरू आहे. पण, इथे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टचं ध्वजारोहण वगळता दुसरं काहीही होत नाही. (छायाचित्र। एएनआय)

  • 5/10

    बिहारमध्ये मधुबनी नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील सकरी येथील हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. फोटो बघून कुणालाही वाटेल की, प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे. पण, दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. (छायाचित्र। एएनआय)

  • 6/10

    सकरी येथील ग्रामस्थांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दलच वास्तव सांगितलं. "हे रुग्णालये केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहे. डॉक्टर, नर्स आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण कुणीही इथे हजर नसत. ते फक्त महिन्यातून एकदा इथे येतात," असं एका गावकऱ्यांनं 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (छायाचित्र। एएनआय)

  • 7/10

    औषधांच्या बॉक्सपासून ते टेबल खुर्च्यापर्यंत सगळं काही धूळखात पडलेलं आहे. रुग्णालय असल्याच्या खाणाखुणाच इथे दिसतात. त्यामुळे नागरिकांना रुग्णालय असूनही हाल सोसावे लागत आहेत. (छायाचित्र। एएनआय)

  • 8/10

    करोनाशी लढा देत असलेल्या बिहारमधील रुग्णालयाचे हे दृश्य देशातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची भीषणता दाखवून देत आहे. बिहारमध्ये अजूनही परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे सरकारला १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला. (छायाचित्र। एएनआय)

  • 9/10

    "इथे डॉक्टर येत नाहीत. हे प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी उघडण्यात येतं. पण, कागदोपत्री हे आरोग्य केंद्र मात्र, सुरू आहे," असं दुसऱ्या एका ग्रामस्थाने सांगितलं. (छायाचित्र। एएनआय)

  • 10/10

    करोनाच्या दुसऱ्या लाटेत बिहारमध्ये नागरिकांना बेड, ऑक्सिजन सिलिंडरसाठी हाल सोसावे लागले. आता लसीकरणातही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोविडशी निगडित अनेक समस्या लोक मांडत असतानाच सकरीतील प्राथमिक आरोग्य केंद्राची ही दृश्ये पुढे आली आहेत. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Bihar primary health centre in madhubani hospital only exists on paper no doctors nurses sanitation workers bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.