Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ashadha ekadashi 2021 pandharpur maharashtra cm uddhav thackeray mahapuja photos scsg

हेची दान देगा देवा! पहा शासकीय महापुजेचे खास फोटो; उद्धव ठाकरेंकडून मानाच्या दांपत्याला विशेष भेट

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली.

July 20, 2021 07:51 IST
Follow Us
  • Ashadha Ekadashi 2021 Pandharpur Ashadha Ekadashi Pandharpur
    1/17

    पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले.

  • 2/17

    यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

  • 3/17

    आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली.

  • 4/17

    यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.

  • 5/17

    पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. करोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असं साकडं मुख्यमंत्री घातलं.

  • 6/17

    आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

  • 7/17

    मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. कोलते दांपत्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

  • 8/17

    पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. महापुजेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.

  • 9/17

    मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

  • 10/17

    आषाढी एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.

  • 11/17

    रंगीबेरंगी फुलांनी रुक्मिणी मंदिराचं प्रवेशद्वार सजवण्यात आलं आहे.

  • 12/17

    विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट पंढऱ्या फुलांनी करण्यात आलीय.

  • 13/17

    फुलांच्या सजावटीमुळे मंदिर फार सुंदर दिसत आहे.

  • 14/17

    विठूरायाकडे तर पाहतच रहावे असं त्याचं सोज्वळ रुप…

  • 15/17

    रुक्मिणी मंदिराच्या सजावटीमध्ये सफरचंदाचा वापर करण्यात आलाय.

  • 16/17

    रुक्मिणी मातेचे रुपही फारच सुंदर दिसत आहे.

  • 17/17

    यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी निर्बंधांमध्ये आषाढीचा सोहळा पार पडत असल्याने भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आलीय.

TOPICS
महाराष्ट्रMaharashtra

Web Title: Ashadha ekadashi 2021 pandharpur maharashtra cm uddhav thackeray mahapuja photos scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.