-
गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…, या जयघोषात राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन पार पडले आहे.
-
गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या आवाजात आणि मोठ्या जल्लोषात मुंबई, पुण्यासह ठिकाणी विसर्जन सोहळा पार पडत आहे.
-
राज्यभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.
-
यंदा करोनामुळे यंदाचा गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे.
-
अनेक ठिकाणी मोठमोठे मिरवणूक सोहळे रद्द करण्यात आले आहेत.
-
गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक लाडक्या बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळत आहे.
-
पुण्यातील तुळशीबाग गणपती मंडळ आणि गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या गणपती मिरवणुकीत अनेक भाविक जमा झाले होते.
-
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर मोठ्या थाटामाटात गणपती विसर्जन सोहळा पार पडला.
-
गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.
-
(सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
गुलालाची उधळण, ढोल-ताशांचे वादन; साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप
Web Title: Ganesh visarjan 2021 mumbai pune ganpati immersion ganesh visarjan nrp