-   महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या कांही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 
-  शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील बाजारात उत्साह पहायला मिळत आहे. 
-  महाराजांचे वेगवेगळे आकर्षक पुतळे बाजारात दाखल झाले आहेत. 
-  यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त बाहेर पडताना दिसत आहेत. 
-  करोनाच्या संसर्गामुळे गतवर्षी शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी करणे, मिरवणूक काढणे यावर बंदी होती. 
-  यंदाच्या वर्षी ही ओमायक्रॉन व्हॅरिएंटच्या सावटामुळे मिरवणूकांना परवानगी मिळण्याबाबत सशंकता आहे. 
-  मात्र चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पुतळ्यास बंदी असल्याने शिवभक्त आणि मूर्तिकारांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. 
-  १९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. 
-  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. 
Photos: सोलापुरात शिवजयंतीचा उत्साह; पण चार फुटांवरील पुतळ्याला परवानगी नसल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी
Web Title: Chhatrapati shivaji maharaj jayanti 19 february statue making in solapur maharashtra photos 2022 sdn